|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » ग्रेट वॉल मोटर्सकडून भारतात नवी योजना

ग्रेट वॉल मोटर्सकडून भारतात नवी योजना 

वृत्तसंस्था/ मुंबई

एसयूवी आणि पिक-अप ट्रक निर्माता चीनची कंपनी ग्रेट वॉल मोटर्सने भारतात नव्या उत्पादनांसह प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या उत्पादनातील यात्री वाहनाला प्रभावीपणे स्पर्धेत आणण्याची कंपनीची योजना आहे. त्याचबरोबर चीनमधील ऑटोमोबाईल कंपनी शांघाई मोटर वाहनांची काही उत्पादने सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे.

ग्रेटवॉल मोटर्स पहिल्यापासून इलेक्ट्रिक वाहने आणि कारसाठी कोडींग स्पॉफ्टवेअर बनवत असून भारतासाठी त्याचा वापर होत आहे. त्याचबरोबर कंपनीने मारुती सुझुकीतील कौशिक गांगुलीची भारतातील योजनेची ब्युप्रिंट तयार करण्यासाठी नेमणूक केली आहे. कौशिक गांगुली हे मारुती सुझुकीमध्ये उत्पादन योजना विभागात प्रमुख अधिकाऱयापैकी एक होते.

ग्रेट वॉल मोटर्सने गेल्या पाच वर्षापासून बऱयाच अभ्यासानंतर भारतात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसयूवीची वाढती मागणी आणि सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर दिलेला भर लक्षात घेऊन कंपनीने कामकाज गतिमान केले आहे. चीनी कंपन्या जपान, अमेरिका आणि युरोप सारख्या विकसित बाजारपेठेला मागे टाकण्यात प्रभावी आहेत, असे आयएचएस मार्केटचे सहयोगी निर्देशक युनीत गुप्ता यांनी म्हटले आहे.