|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राम मंदिर न उभारल्यास मत नाही : प्रवीण तोगडिया

राम मंदिर न उभारल्यास मत नाही : प्रवीण तोगडिया 

फैजाबाद :

 ‘राम मंदिर न उभारल्यास मत नाही’ या घोषणेसहच पुढील आंदोलन केले जाणार असल्याचे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी अयोध्या येथील सभेत म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने शरयू काठावर सभेला अनुमती नाकारून देखील तोगडिया यांनी सभा घेतली आहे. 32 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि विहिंप एकच मुद्दा घेऊन राम मंदिर आंदोलन करत होते. संसदेत कायदा आणून राम मंदिर उभारणार असल्याचे त्यांची भूमिका होती. परंतु आता भाजपला पूर्ण बहुमत मिळून देखील राम मंदिराचे दर्शन घेण्यास देखील हेच लोक येत नसल्याचा आरोप तोगडिया यांनी केला आहे. भाजपने दिल्लीत 500 कोटींचे कार्यालय उभारले, पण भगवान राम आज देखील मंदिराच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लखनौमध्ये बाबरी मशीद उभारणार असून त्यांचे राम मंदिराचे आश्वासन देखील हवेत विरले. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारा भाजपच काँग्रेसयुक्त झाल्याचे तोगडिया यांनी म्हटले. काँग्रेसचा कचरा भाजपमध्ये आणून त्याला मोठय़ा पदांवर बसविण्यात आले आहे. भाजप कार्यकर्ते राम मंदिराचे स्वप्न पाहून अद्याप अश्रू ढाळत असल्याचे म्हणत तोगडियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.