|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » …म्हणे दरवर्षीच काळा दिन

…म्हणे दरवर्षीच काळा दिन 

बेळगाव / प्रतिनिधी

म. ए. समितीच्यावतीने दरवषी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येतो. यामध्ये विशेष काही नाही, असे सांगून राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. काळा दिन कार्यक्रमास परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाचा असतो, असे सांगून जी. परमेश्वर यांनी कायद्याच्या चौकटीतच कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. येथील सांबरा विमानतळावर कन्नड पत्रकारांनी त्यांना काळय़ादिनास परवानगी देणार का? असा प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.

काळय़ा दिनावर बहिष्कार घालण्यात यावा, असा दबाव येत आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनच योग्य निर्णय घेणार आहे, असे सांगितल्याने प्रश्न विचारणाऱया कन्नड पत्रकारांचे चेहरे उतरले. म. ए. समितीच्यावतीने काळा दिन पाळण्याचा कार्यक्रम काही नवा नसून कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोकाक येथील सीआरपीएफ हुतात्मा जवानाच्या अंतिम दर्शनासाठी उपमुख्यमंत्री गोकाकला आले होते. यावेळी बोलताना सरकारवतीने मृत जवानाच्या कुटुंबीयास आवश्यक सुविधा मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार असल्याचे डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.