|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण 

 

पिंपरी / प्रतिनिधी :

आकुर्डी येथील सेंट उर्सुला शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी घडली. मुलावर निगडीतील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. संबंधीत शिक्षिकेवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्?वास दामोदर कांबळे (वय-46, रा. देहुरोड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नंदिनी सुनील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल विश्वास कांबळे (वय-13, रा. बारलोटानगर, गायत्री कॉम्प्लेक्स देहूरोड) असे उपचार सुरु असलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

कांबळे हा सेंट उर्सुला शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकतो. सोमवारी देहूरोडवरून स्कूलबसमधून शाळेत येत असताना शिक्षिकेच्या मुला सोबत त्याचे भांडण झाले. हर्षल हा त्याचा मित्रा सोबत बसून शिक्षिकेच्या मुलाला “गे’ म्हणून चिडवत होता. ही बाब मुलाने शिक्षिका असलेल्या आईला सांगितली. यावरुन राग अनावर होऊन शिक्षिकेने हर्षलला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा अंतर्गत रक्तस्त्राव झाला. हर्षल सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी गेला असता हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी निगडी मधील एका रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.