|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » हर्षी इंडियाने दाखल केली हर्षीज किसेस चॉकलेट बाजारात

हर्षी इंडियाने दाखल केली हर्षीज किसेस चॉकलेट बाजारात 

प्रतिनिधी/ मुंबई

हर्षी इंडिया प्रा. लि. द हर्षी कंपनी या आघाडीच्या जागतिक स्नॅकिंग कंपनी व उत्तर अमेरिकेतील दर्जेदार चॉकलेटच्या सर्वांत मोठय़ा उत्पादकाचा भाग असलेल्या कंपनीने हर्षीज किसेस हा वैशिष्टपूर्ण व पसंतीचा चॉकलेट ब्रॅड भारतात दाखल केला आहे.

हर्षीज किसेस तीन आकर्षक प्रकारामध्ये मिळेल

नेहमी लोकप्रिय असलेले मिल्क चॉकलेट, प्रसिध्द ऍलमंड्स-त्यामध्ये क्रीमी मिल्क चॉकलेट व रिअस ऍलमंड्स बिट्स आणि खास कूकिज एन क्रीम फ्लेवर यामध्ये क्रीमी व्हाइट मिल्क चॉकलेट आहे.

याविषयी बोलतांना, हर्षी कंपनीच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी मिशेल बक म्हणाल्या, हर्षी कंपनीला चॉकलेटची समृध्द पंरपरा आहे व कंपनीने गेली 125 वर्षे कौशल्य विकसित केले आहे. हर्षीज किसेस हे आमचे सर्वांत खास उत्पादन आहे आणि कंपनी जगभर कशाप्रकारे चांगले काम करत आहे. याचे प्रतिक आहे. हा महत्वाचा चॉकलेट ब्रॅड भारतामध्ये दाखल झाला आहे. ही उत्साहाची बाब आहे. कंपनीच्या दृष्टीने ही महत्वाची बाजारपेठ आहे.

भारतात दाखल झाल्याबद्दल, हर्षी कंपनीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्टीव्हन शिल्लर म्हणाले, हर्षी कंपनीसाठी भारतात प्रंचड संधी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा आमच्या नियोजनामध्ये भारत ही महत्वाची बाजारपेठ आहे. भारतातील आमच्या प्रगतीमध्ये हर्षीज ब्रॅड मोलाचे योगदान करत आहे आणि वाढत्या चॉकलेट श्रेणीतील संधीचा लाभ घेऊन या प्रगतीमध्ये सातत्य राखले जाणार आहे.