|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » काकती गावचा विकास साधणार

काकती गावचा विकास साधणार 

वार्ताहर काकती

राणी चन्नम्मांचे माहेर काकती असल्याने ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावच्या विकासाकरिता सरकारी पातळीवर प्राधान्य मिळवून विकास करणार आहे असे आश्वासन खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दिले. राणी चन्नम्मा विजयोत्सव मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने थाटात साजरा झाला. उळागडी खानापूरचे सिद्धेश्वर महास्वामीजी, राचय्या शिवपुजीमठ महास्वामी, उदस्वामी हिरेमठ यांचे सानिध्य लाभले.

प्रांताधिकारी कविता योगप्पण्णवर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी, पोलीस आयुक्त डॉ. व्ही. सी. राजप्पा, ता. कार्यकारी अधिकारी पद्मजा पाटील, जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, एपीएमसी अध्यक्ष आनंद पाटील, ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर, ग्रा. पं. अध्यक्षा सुमन शहापूरकर, उपाध्यक्ष अनिल नार्वेकर, विजयोत्सव समिती अध्यक्ष डॉ. एस. डी. पाटील, डॉ. स्वामी हिरेमठ, मलगोंडा पाटील, तालुका कृषीअधिकारी जी. बी. कल्याणी, रयत केंद्राचे कृषी अधिकारी आर. बी. पाटील, ता. पं. सदस्य मारुती सनदी, उपतहसीलदार राकेश बुवा, नगरसेविका सरला हेरेकर आदी उपस्थिती होते. महापौर बसाप्पा चिकलदिनी यांच्याहस्ते कार्यक्रमाचे दीप्रज्ज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना खासदार हुक्केरी पुढे म्हणाले. राणी चन्नम्मा वाडा खरेदीसाठी पंचवीस लाखाचा निधी ठेवण्यात आला असून खरेदीसाठी लागणारा निधी, चन्नम्मा किल्ल्याचा विकास याकरिता जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी मिळून करणार आहे. काकतीच्या एका वॉर्डचा बेळगाव शहरात समावेश असल्याने स्मार्ट सिटीचा निधीही मोठय़ा प्रमाणात उपयोगात आणण्यात येणार आहे.

 काकती येथील राणी चन्नम्माचा पुतळा गावची शान

काकती येथील राणी चन्नम्माचा पुतळा गावची शान वाढवतो. तसेच छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कडोली गावचे वैभव आहे. काकती व कडोलीचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गावच्यावतीने राचय्या महास्वामी यांनी राणी चन्नम्माचा देसाई गल्लीतील वाडा, किल्ल्याचा विकास करण्याची आवर्जून मागणी केली व दरवर्षीप्रमाणे चन्नम्मा विजयोत्सवासाठी पाच लाख निधीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी, जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांचीही समयोचित भाषणे झाली.

यावेळी देसाई घराण्याच्या वंशज अक्काताई शंकरगौडा देसाई, चन्नाप्पा पुराणिक मठ, यल्लाप्पा दड्डी यासह व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते बलून व कबुतर सोडून राणी चन्नम्मा कित्तूर उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

ज्योतीचे स्वागत

बैलहोंगलहून आणेल्या ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत राणी जन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा राजवाडय़ातील दरबारी अधिकारी वेशभूषेत सालंकृत केलेले होते. चित्ररथ, झांजपथकसह निघालेल्या मिरवणुकीत हजारो नागरिक महिला सहभागी झाल्या होत्या. राणी चन्नम्मा यांच्या पुतळय़ाचे पूजन करून मान्यवर लोकप्रतिनिधी शासन अधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून मानवंदना दिली. कार्यक्रमात तहसीलदार मंजुळा नाईक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रमेश गोणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीडीओ एच. एल. पोळ, व्हिलेज अकाऊंटंट प्रकाश गमाणी, उत्सव समितीचे कार्यकर्ते ग्रा. पं. सदस्य यांनी प्ररिश्रम घेतले.