|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » ‘राफेल’च्या भीतीमुळे ‘चौकीदारा’ने सीबीआय अधिकाऱयांना हटवले : राहुल गांधी

‘राफेल’च्या भीतीमुळे ‘चौकीदारा’ने सीबीआय अधिकाऱयांना हटवले : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल करारातील घोटाळय़ाबाबत चौकशी करत होते, त्यामुळेच त्यांना हटवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला असलेल्या झालावाड येथे आयोजित एका सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधन मोदी यांचा सीबीआय अधिकाऱयांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यामागे हात असल्याचा थेट आरोप केला.

 

काल रात्री देशाच्या चौकीदाराने सीबीआयच्या संचालकांना पदावरुन हटवलं कारण ते राफेल घोटाळय़ाबाबत चौकशी करत होते, असे म्हणत राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधन नरेंद्र मोदींवर आरोप केला. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक व दुसऱया क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आल्यानंतर दोन्ही अधिकाऱयांना पदावरुन हटवण्यात आले आहे. याबाबत राहुल यानी टविटरद्वारेही मोदींवर निशाणा साधला. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल घोटाळय़ाबाबतचे कागदपत्र गोळा करत होते. मात्र, त्यांना बळजबरी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. जो कोणी राफेल घोटाळय़ाबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न करेल त्याला हटवलं जाईल, संपवलं जाईल असा थेट संदेश मोदींनी दिला आहे. देश आणि देशाची राज्यघटना संकटात आहे. असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.