|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मोहन भागवत यांचे रात्री कणेरी मठावर आगमन

मोहन भागवत यांचे रात्री कणेरी मठावर आगमन 

वार्ताहर     : 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवतजी यांचे रात्री 10.45 ला कणेरी मठावर आगमन झाले. त्यांचे स्वागत कणेरी मठाचे मठाधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले. ते बुधवारी होणाऱया सिद्धगिरी हॉस्पिटल निरोनेवीगेशन सिस्टिमच्या लोकार्पण सोहळ्याला व कणेरी मठावर असलेल्या लखपती शेती, सिद्धगिरी म्युझियम, गोशाळा, राशी उद्यान, कारागीर उद्यान आदी ठिकाणी भेट देणार आहेत. तर ते कणेरी मठावर दोन दिवस वास्तव्यास असणार आहेत. या स्वागताच्या दरम्यान येथील व मठावरील लोक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी मठ परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.