|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 7पैशांनी स्वस्त

पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 7पैशांनी स्वस्त 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पेट्रोलच्या दरात आज 25 पैशांची तर डिझेलच्या दरात 7 पैशांनी घट झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे आजचे दर 86.33 प्रति लिटर, तर डिझेलचे दर 78.33 रुपये इतका आहे. गेल्या 9 दिवसांत पेट्रोलचा दर 1.96 रुपये कमी झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील पेट्रोलच्या दरात किरकोळ घट झाली असून डिझेलचे भाव देखील कमी झाली आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 81.10 वरून कमी होत 80.85 रुपये झाला आहे डिझेलचा भाव 74.80 रुपयांवर 74.73 पैसे झाला आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक जिह्यांमध्ये आणि प्रमुख शहरांमध्ये देखील पेट्रोल काही पैशांनी स्वस्त झाले आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत असल्या तरी नागरिकांना मोठा दिलासा मात्र मिळताना दिसत नाही. केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरात अडीच रुपये कमी करण्यात आल्यांनतर राज्य सरकारनेही पेट्रोलमध्ये अडीच रुपये कमी करत दिलासा दिला होता. मात्र यानंतर पुन्हा सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच राहिले. मागील 9 दिवसांपासून मात्र रोज दरांमध्ये घट होत आहे.

Related posts: