|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कोलकाता ते ढाका क्रूझ लवकरच

कोलकाता ते ढाका क्रूझ लवकरच 

भारत-बांगलादेश यांच्यात करार : गुवाहाटीपर्यंत होणार जलवाहतूक

वृत्तसंस्था/ कोलकाता

आगामी काही महिन्यांमध्ये कोलकाता येथून बांगलादेशची राजधानी ढाका तसेच आसामच्या गुवाहाटीसाठी गंगा, पद्मा आणि ब्रह्मपुत्रा नदीत क्रूझ चालविण्याच्या योजनेवर काम होत आहे. भारत आणि बांगलादेशाने प्रवाशांच्या वाहतुकीसाठी प्रक्रिया पूर्ण केल्याने क्रूझ चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोन्ही देशांदरम्यान 1539 किलोमीटर लांबीच्या जलमार्गावर खासगी संस्थांना क्रूझ चालविण्याची अनुमती दिली जाईल. चेन्नई आणि बांगलादेशच्या कॉक्स बाजारादरम्यान सागरी क्रूझ चालविण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान करार झाल्याची माहिती बांगलादेशचे जहाजबांधणी सचिव अब्दुस शम्स यांनी सांगितले.