|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुर्ला मल्लिकार्जुन देवाचा दसरोत्सव उत्साहात

सुर्ला मल्लिकार्जुन देवाचा दसरोत्सव उत्साहात 

प्रतिनिधी/ सांखळी

सांखळी सुर्ला येथील घाडीवाडय़ावरील श्री मल्लिकार्जुन देवाचा वार्षिक दसरोत्सव शुक्रवारी सायंकाळी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. श्री सिद्धेश्वर देवस्थान, घाडी कुटुंबिय आणि इतर सर्व संबंधितांच्या संयुक्त विद्यमाने हा पारंपरिक दसरोत्सव साजरा करण्यत येत आहे. सोन लुटण्याचा कार्यक्रमही उत्साहात झाला.

गुरुवारी रात्रीपासून या उत्सवाला सुरुवात झाली. यात धार्मिक विधी झाल्या. गावातील मंडळीनी देवाचे आशीर्वाद घेऊन कौल घेतला. यंदा हा कार्यक्रम काही कारणास्तव पुढे गेला असला तरी मंदिर परिसरात तोच उत्साह पाहायला मिळाला. गोव्यातील अनेक भाविक या उत्साहात सामील झाले होते.

सुर्ला गावातील बाराही वाडय़ावरील नागरिक या उत्साहात सहभागी होऊन देवाचा कौल घेतात तसेच उद्या 27 आणि 28 रोजी देऊळवाडा, भिले, जोशीभाट, खडळ, भायळीफाळ, बाये – सुर्ला, डिंगणे, गावकरवाडा, रुमड, खाजन इत्यादी ठिकाणी फिरुन घरोघरी कौल दिला जातो. 29 रोजी मल्लिकार्जुन मंदिरात वार्षिक पद्धतीने धार्मिक विधी झाल्यावर उत्सवाची सांगता होईल.

दगडावर देव (तरंग) उभे राहातो हे खास आकर्षण

सांखळी – सुर्ला येथील श्री मल्लिकार्जुन देवाचे तरंग दसरोत्सवात कशाचा ही आधार न घेता दगडावर तासभर उभे राहाते. हे या उत्सवाचे खास आकर्षण असते. तसेच या उत्सवात घाडी कुटुंबियांतर्फे तसेच संबंधितांकडून धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार साजरा झाला. मंदिर परिसरातील झाडांची पाने सोने म्हणून वाटण्यात आली.