|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » भारद्वाज यांच्या अटकेसाठी पोलीस हरयाणात

भारद्वाज यांच्या अटकेसाठी पोलीस हरयाणात 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली  :

नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या मानवाधिकार कार्यकत्यर्ग सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळताच त्यांना अटक करण्यासाठी पोलीस हरयाणाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे भारद्वाज यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्मयता बळावली आहे. .स्त्रियांना सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही. त्यामुळे त्यांना काल रात्री अटक करण्यात आली नव्हती. आज सकाळीच पोलीस हरयाणातील भारद्वाज यांच्या घराकडे रवाना झाले असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्यात येणार आहे.

अटक टाळता यावी म्हणून सुध भारद्वाज, अरुण फरेरा आणि वेर्नन गोन्साल्वसि यांनी पुणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी फरेरा आणि गोन्साल्वसि यांना अटक केली होती. यापूर्वी या तिघांना 29 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्यांनी नजरकैदेत ठेवण्यात आलं होते.