|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » एफडीए नोंदणी सक्ती लागू

एफडीए नोंदणी सक्ती लागू 

प्रतिनिधी/ पणजी

परराज्यांतून मासळी आयात करणाऱया ट्रकांना अन्न औषध प्रशासनाची (एफडीए) नेंदणी सक्ती शनिवारपासून लागू केली असून एफडीएत नोंदणी नसल्याने सुमारे 50 मासळीचे ट्रक गोव्याचा सीमेवरुन परत पाठविण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

परराज्यातील आयात करणाऱया मासळी ट्रकांची त्यांच्या राज्यातील एफडीएची किंवा गोव्यातील एफडीएची नोंदणी असणे गरजेचे आहे. नोंदणी नसलेल्या ट्रकांना गोव्यात मासळी आणता येणार नाही. त्यासाठी गोव्यातील सर्व तपासणी नाक्यावर पोलिसांना ट्रक तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासोबत एफडीएचे सदस्यही असणार आहेत. कालपासून याची कडक कारवाई सुरु झाली आहे. शिवाय ही वाहने निर्जंतूक असली पाहिजे, असे यावेळी राणे यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यात मासळी प्रयोगशाळा उभारणार

सोमवारी एफडीएच्या निरीक्षकांसोबत मडगावातील घाऊक मासळी मार्पेटची तपासणी केली जाणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण गोव्यात जागतिक दर्जाची प्रयोगशाळा उभारण्यासाठी मंत्री विजय सरदेसाई यांच्यासोबत पाहणी केली जाणार आहे. आता मासळीविषयी कोणताही गैरकारभार करायला दिला जाणार नाही. बेकायदेशीर होणाऱया मासळी वाहतुकीवर आता अंकुश बसणार आहे. नोंदणी सक्तीमुळे मासळीची योग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे गोव्यात परराज्यातून आयात होणारी मासळी ही एफडीच्या निदर्शनाखाली येणार आहे, असे यावेळी राणे म्हणाले.

मासळी व्यावसायिकांसाठी कडक नियम

याचा फटका गोव्यातील स्थानिक मासळी विक्रत्यांना होणार नाही याची काळजी  घेतली जाणार आहे. गोवेकरांना चांगल्या दर्जाची मासळी मिळावी यासाठी एफडीए कार्यरत असून सर्व प्रकारची तपासणी व कडक नियम आता मासळी व्यवसायासाठी  rलादण्यात आले आहे. याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते व तसे परिपत्रक जारी करण्यात आले होते. पण मासळी व्यापारी पुढे आले नसल्याने आता सक्तीने हे लागू करण्यात आले आहे. गोव्यात परराज्यांतून रोज सुमारे 80 ट्रक मासळी आयात करतात. गोव्यातील मोठमोठय़ा हॉटेल्सना ही मासळी पुरविली जाते. आम्ही हॉटेलवाल्यांच्या विरोधात नसून जर त्यांनी नोंदणीकृत ट्रकमधील मासळी घेतली तर ती सर्वासाठी लाभदायक आहे, असे राणे म्हणाले.

Related posts: