|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » 24 तास वीज पुरवठा होत नाही तो वर दरवाढ नाही

24 तास वीज पुरवठा होत नाही तो वर दरवाढ नाही 

प्रतिनिधी/ मडगांव

गोव्यातील जनेतला 24 तास अखंडित वीज पुरवठा करणे, याला आपण प्राधान्य देत असून जो पर्यंत 24 तास अखंडित वीज पुरवठा होत नाही तोवर वीज दरवाढ केली जाणार नसल्याची माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी मडगावात प्रसार माध्यमांकडे बोलताना दिली. सद्या वीज खात्यात मुख्य अभियंत्याची जागा रिक्त असून या जागेवर आपण गोमंतकीय व्यक्तीला संधी देणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

45 दिवसात आपण वीज खात्यासंदर्भात श्वेत प्रत्रिका जारी करणार असल्याची घोषणा मंत्री नीलेश काब्राल यांनी वीजमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केली होती. पण, यासाठी आपल्याला आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सद्या गोव्यातील जनेतला 24 तास वीज पुरवठा कशा प्रकारे करता येईल यावर आपण भर दिला असून 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

वीज खात्याचा कारभार सुरळीत करण्यासाठी आपल्याला आणखीन काही दिवस लागतील. आपण पीपीपी व संयुक्त भागीदारीत वीज पुरवठय़ात सुरळीत पणा आणण्याच्या दृष्टीकोनातून विचार करीत आहे. त्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाची सामुग्री खरेदी करावी लागली तरी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच ती केली जाईल असे त्यांनी सांगितले.

गोव्यातील जनेतला 24 तास अखंडित वीज पुरवठा झाला तर घरगुती व व्यावसायिक वीज वापर करणारे ग्राहक 10 ते 20 पैशांची वाढ सहजस्वीकारतील असा दावा त्यांनी यावेळी केला. गोव्यात 100 टक्के वीज पुरवठा झालेला आहे. पण, 24 तास अखंडित वीज पुरवठा करणे हे मोठे आव्हान असून ते पेलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

मडगाव-फातोडर्य़ातील भूमिगत वीज वाहिन्याचा वापर नाही

मडगाव व फातोर्डा परिसरात सुमारे 40 कोटी रूपये खर्च करून 7-8 वर्षापूर्वी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. पण, अद्याप या वीज वाहिन्याचा वापर झालेला आहे. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी सर्व सामान्य जनेतच्या खिश्यातील पैशांचा वापर झालेला आहे. या वीज वाहिन्याचा शक्य तेव्हढय़ा लवकर वापर करण्यासाठी आपण भर देणार आहे. या वीज वाहिन्याची लवकरच चाचणी घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भूमिगत वीज वाहिन्याचा वापर झाला नसल्याने आपण कुणाला दोष देणार नाही. पण, सत्यपरिस्थिती की, या वाहिन्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते.

मुख्य वीज अभियंता गोमंतकीय

दरम्यान, वीज खात्याचा कारभार या पुढे गोमंतकीय व्यक्ती हाताळणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले. सद्या रेड्डी यांच्याकडे मुख्य अभियंत्याचा ताबा आहे. त्यांना दोन वेळा मुदत वाढ दिली असून त्याचा कार्यकाळ बुधवार दि. 31 ऑक्टोंबर रोजी संपुष्टात येतो. त्यानंतर गोमंतकीय व्यक्तीला मुख्य अभियंता पदी बढती दिली जाईल, त्याच बरोबर चार अधीक्षक अभियंता नियुक्त केले जातील. ज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊनच ही बढती दिली जाईल व त्यासाठी आपण 31 रोजी मुख्यमंत्र्यांकडे या विषयावर बोलणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: