|Sunday, January 20, 2019
You are here: Home » Top News » इंडोनेशियाचे प्रवासी विमान समुद्रात कोसळले

इंडोनेशियाचे प्रवासी विमान समुद्रात कोसळले 

ऑनलाईन टीम / जकार्ता  :

इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचे जेटी 610 हे प्रवासी विमान समुद्रात कोसळलं. हवाई विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. अपघाताच्या वेळी विमानात क्रू मेंबरसह 188 जण होते, अशी माहिती इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱयाने दिली आहे.

 

या 188 जणांमध्ये 178 प्रौढ, एक चिमुकला, दोन नवजात बाळ, दोन पायलट आणि पाच फ्लाईट अटेंडंन्ट यांचा समावेश होता. यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही. इंडोनेशियाची राजधनी जकार्ताहून पान्गकल पिनांग शहरात जाणाऱया या विमानाने आज (29 ऑक्टोबर) सकाळी 6.33 वाजता उड्डाण केल्यानंतर, 13 मिनिटांनी त्याचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यावेळीच विमान कोसळण्याची शक्मयता वर्तवली जात होती. अखेर देशाच्या हवाई विभागाच्या अधिकाऱयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच विमानाच्या सीटसह इतर अवशेष जागा समुद्राच्या किनाऱयाजवळ सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Related posts: