|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात 27 जानेवारी रोजी ‘फॅमाथोन’ स्पर्धा

राज्यात 27 जानेवारी रोजी ‘फॅमाथोन’ स्पर्धा 

क्रीडा प्रतिनिधी/ पणजी

गँग ऑफ यंगस्टर यांच्यातर्फे दि. 27 जानेवारी 2019 रोजी ‘फॅमाथोन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फॅमाथोन ही मॅराथोन देशातील पहिली फॅमिली मॅराथोन आहे. अशाप्रकारची स्पर्धा देशात कुठेही होत नाही. गेली दोन वर्षे या स्पर्धेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहूनच यावर्षी देखील ही स्पर्धा आयोजित करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. असे आयोजक राहूल कामत यांनी सांगितले.

पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत कामत यांनी ही माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत स्पर्धेचे नियंत्रक ओंकार वायंगणकर, विभूती कामत, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सदर स्पर्धा 1 किमी, 3 किमी, 5 किमी, व 10 किमी अशा चार विभागात पार पडणार आहे. स्पर्धेची सुरुवात आणि सांगता बांबोळी येथील एथलेटिक्स स्टेडियम येथे होणार आहे. यावेळी विजेत्या फॅमिलीला आकर्षक बक्षिसे देण्यात येईल. तसेच सहभागी फॅमिलीला देखील प्रशस्तिपत्रके देऊन सन्मानित करण्यात येईल. असे कामत यांनी पूढे सांगितले.

आताच्या आधुनिक काळात आरोग्य सारख्या गंभीर विषयावर लक्ष देण्यासाठी कुणाकडे वेळ नाही आहे. त्यामुळे तंदरुस्त राहण्याचा मंत्र देण्यासाठी तसेच दोन पिढयांचे अंतर भरुन काढण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया दि. 2 नोव्हेंबर 2019 पासून सरु होणार आहे. यासंबधीत अधिक माहीतीसाठी 9923843467 किंवा www.famathonindia.com या संकेतस्थळावर भेट द्यावी अशी माहीती नियंत्रक ओंकार वायंगणकर यांनी दिली.