|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » उद्योग » दबावामुळे भारतीय भांडवली बाजारात घसरण

दबावामुळे भारतीय भांडवली बाजारात घसरण 

निफ्टीत 0.5 टक्क्यांची घसरण : सेन्सेक्स 176 अंकांनी खाली

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय समभाग बाजारांसाठी मंगळवारचा दिवस उतार-चढावाचा राहिला.  मंगळवारच्या सत्राचा प्रारंभ घसरणीसह झाला, परंतु बाजार पुढील कालावधीत सावरल्याचे दिसून आले. पण, दुपारनंतर पुन्हा एकदा दबावाचे चित्र निर्माण झाले आणि अखेरीस मुंबई शेअरबाजार निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये चांगली खरेदी दिसून आली आहे. मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप निर्देशांक 0.9 टक्क्यांनी वधारला आहे. राष्ट्रीय शेअरबाजाराचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.7 टक्क्यांच्या वधारासह बंद झाला. मुंबई शेअरबाजाराचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी तेजीत आला आहे.

मुंबई शेअरबाजार निर्देशांक 176 अंक म्हणजेच 0.5 टक्क्यांनी घसरून 33,891 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांक 52.5 अंक म्हणजेच 0.5 टक्क्यांच्या घसरणीसह 10,1984.4 अंकांवर बंद झाला. 

खासगी बँकिंग, मेटल, फार्मा, वित्तीय सेवा आणि ऑईल अँड गॅस समभागांमधील विक्रीमुळे शेअरबाजारांवर दबाव निर्माण झाला. बँक निफ्टी 0.6 टक्क्यांच्या घसरणीसह 24,808 अंकांवर बंद झाला. पीएसयू बँक, आयटी, रियल्टी आणि कॅपिट्ल गुड्स समभागांमध्ये खरेदी दिसून आली .

दिग्गज समभागांमध्ये एचपीसीएल, कोल इंडिया, बीपीसीएल, सिप्ला, आयओसी, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा आणि पॉवर ग्रिड हे समभाग 1.8-4 टक्क्यांनी खाली आले आहेत. परंतु टेक महिंद्रा, झी एंटरटेनमेंट , ग्रासिम, एचयूएल, डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, एसबीआय, टीसीएस आणि टाटा मोटर्स 1.1-3.1 टक्क्यांनी वधारले आहेत.

मिडकॅप समभागांमध्ये युनियन बँक, कॅनरा, बँक, इंडियन बँक, अदानी पॉवर आणि रॅम्को सिमेंट 5.7-8.5 टक्क्यांनी तेजीत आले. परंतु मॅक्स फायनान्शियल, टीव्हीएस मोटर्स, एमआरपीएल, टोरंट पॉवर आणि एम्फॅसिस 2.7-2.7 टक्क्यांनी घसरले आहेत.