|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अतिरिक्त तणावामुळे अनेक जण गंभीर आजारी

अतिरिक्त तणावामुळे अनेक जण गंभीर आजारी 

शासन व संस्थानी गांर्भियाने घेणे गरजेचे

सुमंत महाजन/ शिराळा

   सध्या सर्व क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात स्पर्धा निर्माण केली जात आहे. याचा परिणाम म्हणजे सर्वत्र कर्मचारी, अधिकारी मोठय़ा प्रमाणावर तणाव ग्रस्त झाले अनेक त्यांना रक्तदाब, ह?दयरोग अशा व्याधी झाल्या आहेत.असेच सुरू राहिले तर सरकारी, निमसरकारी, सहकारी संस्था व खाजगी संस्थेमध्ये काम करण्यासाठी लोक राजी होणार नाहीत अशी भिती व्यक्त होत आहे. यामुळे शासनाने व त्या अनुषंगाने असणार्या ’कार्पोरेट ’कंपन्यांनी  टार्गेटचे शुक्लकास्ट लावू नये असे सुज्ञ लोकाना वाटते.

       भारत महासत्ता होण्याच्या शर्यतीत आहे अर्थातच हे अभिमानास्पद आहे. यामुळे भारताकडे कोणी वाकडय़ा नजरेने पाहणार नाही हि वस्तुस्थिती आहे. पण हे करत असताना ज्यांच्या जीवावर हे स्वप्न साकार करत आहोत ते कामगार, कर्मचारी, अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या जीवावर घाला घालत आहोत याचे भान असणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र ’टार्गेटचे ’युग सुरू झाले आहे. टार्गेट दिल्या शिवाय प्रगती होणार नाही हे खरे असले तरी यामुळे काम करणारा कर्मचारी प्रचंड दडपणाखाली आहे हे क्षणोक्षणी आढळून येते. देशात विजय मल्ल्या, निरीव मोदी यानी बॅंकेला गंडा घातला अनेक  अधिकारी  अडचणीमध्ये आले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक बॅंकेच्या शाखेत कर्ज देताना काळजी घेतली जाते पण यामुळे टार्गेट पूर्ण होत नाही. टार्गेट पूर्ण झाले नाही म्हणून मेमो दिला जातो, बढती रोखली जाते काही वेळा  सक्तीच्या रजेवर पाठवले जाते यामुळे कर्मचारी, अधिकारी प्रचंड तणावाखाली असतात. हल्ली अनेक योजना सुरू झाल्या आहेत त्या योजना निवडणुकी पुर्वी  पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी कर्मचारी व अधिकारी यांना प्रचंड  वेगाने पळवले जात आहे. पळवताना त्या कर्मचार्याची क्षमता पाहिली जात नाही त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावाखाली वावरत असतो तरीही  वरीष्ठ फोर्स करतात म्हणून पळत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब, ह?दयरोग, अतिरिक्त साखर, मेंदूरोग यासारखे आजार कवटाळत आहेत हे लक्षात येत नाही. हे लक्षात येई पर्यंत वेळ निघून गेलेली असते .त्यामुळे औषधाची व दवाखान्याची साथ सुरू झालेली असते  सध्या समाधान योजना, सौभाग्य योजना,  घरकुल योजना , उज्वला गॅस योजना, प्राधान्य कुटूंब योजना, मुद्रा योजना, अशा योजना वेगाने सुरू झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य माणूस सुखी होत आहे हे खरे असले तरी या योजनेसाठी काम करणारे सर्वजण तणावाखाली आहेत. अती वरीष्ठ अधिकारी, सचिव आणि मंत्री रोज जाब विचारतात यामुळे सर्व भितीखाली वावरत आहेत. लोकप्रतिनिधी अधिकार्याना जाब विचारून पाणउतारा करत असतात, अपमानास्पद वागणूक देतात यामुळे सर्वजण विविध रोगाना बळी पडतात . देशात सध्या ह?दयरोगाचे -लाखो लोक असुन लाखो-लोक मृत्युमुखी पडले आहेत. रक्तदाबाची अशीच स्थिती आहे. देशात घरटी लोक असुन शुगरचे घरटी रूग्ण  आहेत.शिवाय नैराश्य ग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस हे प्रमाण  वाढत आहे हे खुप चिंताजनक आहे. यामुळे आपण महासत्ता बनण्याच्या नादात एका वर्गाला (कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिक इत्यादी)रोगट बनवत आहे हे सुज्ञानी लक्षात ठेवले पाहिजे. व्यवसायिक लोक, अधिकारी यानी अतिरिक्त ताण सहन न झाल्याने अनेक अधिकारी, व्यवसायिक यानी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात काही पोलिस कर्मचारी व अधिकारी यांनी आत्महत्या केल्या.    गेल्या आठवडय़ात महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये काही व्यवसायिकानी मरणाला कवटाळले आहे हे आपल्या समाजाला, शासनाला, कार्पोरेट जगाताला भूषणावाह नाही. त्यामुळे टार्गेटचा अतिरेक करू नये असे कर्मचारी, अधिकारी यांना वाटते.

Related posts: