|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कारखाने बंद ठेवा, अन्यथा आंदोलनाचा भडका

कारखाने बंद ठेवा, अन्यथा आंदोलनाचा भडका 

प्रतिनिधी /सांगली :

जोपर्यंत ऊसदराबाबत सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत जिह्यातील कारखानदारांनी साखर कारखाने बंद ठेवावेत अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख व महेश खराडे यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनाबाबत रणनीति ठरविण्यासाठी शुक्रवार दोन नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता इस्लामपूर गेस्ट हाऊस येथे संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असल्याचेही देशमुख व खराडे यांनी सांगितले.

शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार दर देता येत नसल्याचे सांगत कोल्हापूर जिह्यातील साखर कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  ऊस उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी जिह्यातील साखर कारखानदारांनी मात्र कारखाने सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख म्हणाले, स्वाभिमानीच्या ऊसपरिषदेमध्ये खा. राजू शेट्टी ंयानी 9.50 टक्के †िरकव्हरीनुसार एफआरपी अधिक दोनशे रुपये दराची मागणी केली आहे. उढस उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम मिळाले पाहिजे अशी संघटनेची भूमिका आहे. मात्र मागणीप्रमाणे दर देता येत नसल्याचे सांगत कोल्हापूर जिह्यातील साखर कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर जिह्यातील कारखानदारांनीही कारखाने बंद ठेवावेत.

अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल

चळवळ व शेतकऱयांना सहकार्य करण्याची भूमिका कोल्हापूर जिह्यातील साखर कारखानदारांनी घेतली आहे. सांगलीतील कारखानदारांनी मात्र नेमकी उलटी भूमिका घेतली आहे. त्यांनीही ऊसदराबाबात सकारात्मक तोडगा निघात नाही, तोपर्यंत कारखाने बंद ठेवावेत. अन्यथा जिह्यात आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा देत महेश खराडे म्हणाले, जिह्यातील साखर कारखानदारांनी कारखाने बंद ठेऊन सहकार्य करावे. कार्यकर्त्यांना ताकदीने आंदोलनात उतरण्यास भाग पाडू नये. असे झाले तर एकाही कारखान्याचे धुराडे पेटणार नाही.

Related posts: