|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » उद्योग » ‘एमिरेट्स’ साजरी करणार दिवाळीची खास धमाल

‘एमिरेट्स’ साजरी करणार दिवाळीची खास धमाल 

वृत्तसंस्था/ मुंबई

दिवाळीच्या पारंपरिक उत्साहासह एमिरेट्स या पुरस्कारविजेत्या विमानसेवा कंपनीने यंदाची दिवाळी विशेष साजरी करण्याचे ठरवले असल्याने एमिरेट्स येत्या काही दिवसांत प्रवास करणाऱया भारतीय प्रवाशांना कंपनीतर्फे विशेष भेट देण्यात येणार आहे.

 विमानसेवा कंपनीने दिवाळी विशेष भाडेसूट जाहीर केली असून, न्यूयॉर्क, शिकागो, लंडन, ऑरलँडो, माद्रीद, लिस्बन, प्रँकफर्ट आणि बार्सेलोना या ठिकाणांसह नऊ विमानतळांवर ही सवलत लागू होणार आहे.

4 ते 10 नोव्हेंबर कालावधीत दुबई व भारत या दोन्ही ठिकाणी सर्व श्रेणीचा प्रवास करणाऱया प्रवाशांना क्लासिक भारतीय मिठाई आणि दिवाळीशी संबंधित अन्य भेटवस्तू देण्यात येणार आहेत. ग्राहकांना विशेष खाद्यपदार्थ देऊन जगातल्या काही ठराविक लाऊंजेसमध्येही एमिरेट्सतर्फे दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

‘जगभरातल्या भारतीयांसाठी दिवाळी सणा बद्दलची उत्सुकता लक्षात घेऊनच  कंपनी दिवाळी सणाच्या सेलिब्रिशनमध्ये नवीन फ्लेव्हर्स सादर करून सहभागी होत असून यांचा आम्हाला आनंद असल्याचे कंपनीने म्हटले आहे. फेस्टिव्हल काळात एमिरेट्स विमानांतून प्रवास करताना भारतीय प्रवाशांना घरगुती पदार्थांची चव घेता येईल, तो आनंद त्यांना आम्ही देऊ शकू अशी आम्हाला आशा आहे,’ असे एमिरेट्सच्या भारत व नेपाळ विभागाच्या उपाध्यक्षा एस्सा सुलेमान अहमद म्हणाल्या. या फेस्टिव्ह आठवडय़ात, एमिरेट्सतर्फे इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना मोतीचूर लाडू जेवणासोबत देण्यात येणार आहेत. प्रथम आणि व्यापारी दर्जातील प्रवाशांना अंजीराचे पदार्थ म्हणजेच अंजिर चक्कर, मोतीचूर लाडू डेझर्ट मेन्यूमध्ये देण्यात येणार आहेत.