|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » जिल्ह्यातील किमान तीन तालुक्यांना भेट देण्याचे पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

जिल्ह्यातील किमान तीन तालुक्यांना भेट देण्याचे पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश 

प्रतिनिधी / जळगाव :

राज्यातील दुष्काळी परिस्थिती समजावून घेण्यासाठी प्रत्येक पालकमंत्री यांनी आपापल्या जिल्हयात जाउुन किमान तीन तालुक्यातील पाच गावांनाभेटी देउुन परिस्थिती जाणूनघ्यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे व त्या नुसार आपण पाहाणीसाठी आल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जळगाव जिल्ळयातील चाळीसगाव,भडगाव,पाचोरा आणि जळगाव तालुक्यातील सात गावांनाभेटी देउुन शिवारातील पिकांची पाहाणी,पाणी टंचाई व त्या बाबतच्या उपाययोजना या संदर्भात शेतकरी ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

पाहाणी दौ-यानंतर चंद्रकांत पाटील यांनी टंचाई बाबत अधिका-यांची आढावा बैठकघेउुन जिल्हयाची स्थिती व केल्या जात असलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली.

यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरूवारी मुख्यमंत्री यांनी सर्व पालकमंत्री यांना आपापल्या जिल्हयातजाउुन किमान तीन तालुक्यातील पाच गावांनाभेटी देउुन दुष्काळी परिस्थिती समजून घेण्याचे आदेश दिले ,या नुसार आपण आलो असून सात गावांना भेटी दिल्याचे सांगितले जळगाव जिल्हयातील १३ तालुके तसेच एरंडोल व धरणगाव तालुक्यातील तीन मंडळ येथे दुष्काळी परिस्थिती असून  सर्व पाणीसाठे हे माणसे व जनावरे यांच्यासाठी पिण्यासाठी राखून ठेवण्याच्या सूचना दिल्याअसून जेथे पाणी उपलब्ध नसेल तेथे नवीन पाणी स्त्रोत शोधून पाणी पुरवठयाच्या योजना घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. जळगाव जिल्हयात खरीप हंगामात ४१ दिवस पावसाचा खंड पडल्याने कापूस ,सोयाबीन ,मका मुग उडीद आदी पिकात उत्पादनातघट आल्याचे त्यांनी सांगितले

गिरणाकाठ तहानलेला असल्याने गिरणा धरणातून तीन दिवसात एक आवर्तन सोडण्याच्या सूचना चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या .जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाया वाघूर धरणातील पाणीसाठा पाहता जळगाव शहराला तीन दिवसाआड पाणी देण्याचे संकेत यावेळी दिले गेले.

Related posts: