|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Automobiles » महिंद्रा ब्लेझो एक्स ट्रक दाखल

महिंद्रा ब्लेझो एक्स ट्रक दाखल 

मुंबई / प्रतिनिधी :

महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने लोकप्रिय ब्लेझो ट्रक अपग्रेड करून, एचसीव्ही ट्रक रेंजमध्ये ब्लेझो एक्स दाखल केल्याची घोषणा आज केली. ‘ब्लेझो एक्स हा ब्लेझोपेक्षा अधिक मायलेज देऊन, तसेच अधिक मायलेज मिळवा किंवा ट्रक परत करा’ ही मायलेजविषयक विशेष व अपूर्व हमी देऊन, वाहतूकदारांची वाढत्या इंधनदराची चिंता मिटवणार आहे.

नव्या ब्लेझो एक्समध्ये अनेक सुधरणा केल्या आहेत. वाहनाची एअर मॅनेजमेंट सिस्टीम, रोलिंग वैशिष्टय़े व वाहनाचे रोटेटिंग पार्टस यांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधरणा केली आहे. वाहतूकदारांच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्ये इंधन हा मुख्य घटक असतो आणि इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ब्लेझो एक्स दाखल केला जाते आहे. नवी ब्लेझो एक्स सीरिज सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे – हॉलेज, ट्रक्टर-टेलर व टिपर आणि त्यामध्ये ब्लेझोचे कमालीचे यशस्वी झालेले फ्युएलस्मार्ट तंत्रज्ञान समाविष्ट आहे.

कंपनीने काश्मीर ते कन्याकुमारी या दरम्यान, 3,800 किमी एक्स्प्रेस नॉर्थ-साउथ सर्व्हिस कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणाही केली आहे. यानिमित्त बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले की, ब्लेझो दाखल झाल्यापासून, ब्लेझोने अनेक बाबतीत महिंद्राच्या सीमा विस्तारल्या आहेत.