|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला विनापरवाना लाकूड जप्त.

गडहिंग्लजला विनापरवाना लाकूड जप्त. 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

सावर इमारती लाकूडाची विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो शुक्रवारी दुपारी गडहिंग्लज भडगाव मार्गावर वनविभाने जप्त केले आहे. विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो चालक गुलजार अलिसो जमादार (रा. नेसरी) याचा विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये टेम्पोसह (एमएच 07 पी 1162) एकूण 1 लाख 55 हजार 376 रूपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. आजरा परिमंडलाचे वनक्षेत्रपाल डॉ. सुनिल लाड यांच्या सुचनेनूसार गस्त घालत असताना वनपाल अशोक कोरवी, वनरक्षक कृष्णा डेळेकर, वनरक्षक नागेश खोराटे, वनरक्षक संजय कांबळे यांनी कारवाई केली आहे. याचा अधिक तपास वनक्षेत्रपाल डॉ. सुनिल लाड करत आहेत.