|Monday, March 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » जीवनाचा मंत्र सांगणारा फ्लिकर

जीवनाचा मंत्र सांगणारा फ्लिकर 

मराठीत नेहमीच वेगवेगळय़ा विषयांवर आधारित चित्रपट बनत असल्याचे इतर चित्रपटसफष्टीतील मान्यवरांनीही कबूल केले आहे. विषय आणि आशयाची एकसंध मांडणी करून लिहिलेली पटकथा आणि त्याला दिलेली मनोरंजक मूल्यांची जोड या कारणांमुळे मराठी चित्रपट इतर प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेत उजवा ठरतो. याशिवाय अनोख्या शीर्षकांमुळेही मराठी चित्रपट वेगळे अस्तित्व जपण्यात यशस्वी होतो. असेच एक वेगळे शीर्षक असलेल्या फ्लिकर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

  निर्माते राज सरकार यांनी महेक फिल्म्सच्या बॅनरखाली फ्लिकर या आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आपल्या कोणत्याही कार्याची सुरुवात करणारे तसेच आपल्या मातफभाषेबाबत मनात अत्यंत आपुलकीची भावना असणाऱया राज सरकार यांच्या म्हणण्यानुसार मराठी सिनेमा आशय आणि विषयाच्या बाबतीत जागतिक सिनेमाच्या तोडीचा आहेच. पण, त्याला आणखी ग्लॅमरची जोड देण्याचा प्रयत्न फ्लिकरच्या निमित्ताने केला जात आहे. याबाबत विस्ताराने बोलताना सरकार म्हणाले की, हा सिनेमा केवळ मनोरंजन करणारा नसून जीवन जगण्याचा अचूक मंत्र सांगणाराही असेल. मनाला भिडणारे कथानक, कर्णमधुर संगीत, सहजसुंदर अभिनय, नेत्रदीपक सादरीकरण आणि दर्जेदार निर्मिती मूल्यांच्या आधारे बनवला जाणारा फ्लिकर हा सिनेमा मराठी रसिकांसोबतच अमराठी प्रेक्षक आणि सिनेसफष्टीतील मान्यवरांनाही आपलासा वाटणारा ठरेल असा विश्वास सरकार यांनी व्यक्त केला.

  हँडसम लुक, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज, लक्षवेधी अभिनय शैली असे व्यक्तिमत्त्व असणाऱया राजवीरचा हा पहिलाच सिनेमा असला तरी रसिकांवर मोहिनी घालण्याची क्षमता त्याच्या ठायी आहे. राजवीरच्या जोडीला तन्वी किशोर ही अभिनेत्री या सिनेमात चमकणार आहे. दोघांची अनोखी केमिस्ट्री या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल पाडावे करत आहेत. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांच्या जादुई संगीताचा स्पर्श लाभणे हे फ्लिकरचे अहोभाग्य म्हणावे लागेल. या निमित्ताने इलायराजा यांनी प्रथमच एखाद्या मराठी सिनेमाला पूर्णपणे संगीत दिले आहे. याशिवाय कोलावरी डी… फेम धनुषने या चित्रपटासाठी एक गाणंही गायले आहे. फ्लिकरमध्ये राजवीर सरकार, तन्वी किशोर, सयाजी शिंदे, संजय मोने, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरुण कदम, गौरव घाटणेकर, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, विशाखा सुभेदार, प्रभाकर मोरे, सायली जाधव, प्रतीक्षा शिर्पे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच अमोल पाडावे यांनीच या सिनेमाची कथादेखील लिहिली आहे. पटकथा जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिली असून संवाद समीर सामंत आणि मंदार चोळकर यांचे आहेत.

Related posts: