|Friday, August 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » साजरी होणार आगळीवेगळी भाऊबीज

साजरी होणार आगळीवेगळी भाऊबीज 

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच भाऊ बहिणीचं नातं असतं. या नात्याची हीच खासियत आहे. भाऊ बहिणीचं नातं साजरं करणारा भाऊबीज हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या नात्यातला गोडवा ही भाऊबीज द्विगुणीत करते. नात्यांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आता सगळेच भाऊ बहीण उत्सुक असतील.

अशाच एका बहिणीने आपल्या भावाचं कौतुक करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पण, तिची ही भाऊबीज मात्र आगळी वेगळी आहे. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट या आगामी मराठी चित्रपटाची नायिका जानकी पाठक दरवर्षीप्रमाणे यंदाही तिचा लाडका कुत्रा पॅस्पर याच्यासोबत तिची भाऊबीज साजरी करणार आहे. एक भाऊ बहिणीसाठी जे काही करतो ते सगळंच पॅस्पर जानकीसाठी करतो. कोणत्याही प्रसंगात तो तिच्यासोबत असतो. आणि म्हणूनच जानकी दरवर्षी पॅस्पर सोबत आपली भाऊबीज साजरी करते. ही भाऊबीज साजरी करताना ती पॅस्परला ओवाळणार आहे. त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालणार आहे. इतकंच नाही तर तिने त्याच्यासाठी एक छानसं गिफ्टसुद्धा आणलं आहे. तिचं हेच प्राणीप्रेम आपल्याला लवकरच व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट चित्रपटातूनही पाहायला मिळणार आहे. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट हा सिनेमा 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नवोदित अभिनेत्री जानकी पाठक हिच्यासोबत रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते डॉ. सुनील निचलानी आहेत.