|Saturday, March 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » दिवाळीच्या मुहूर्तावर बाळू-लक्ष्मीची भेट

दिवाळीच्या मुहूर्तावर बाळू-लक्ष्मीची भेट 

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा अभिनय, कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे, जे मालिकेच्या टीआरपीमधून देखील दिसून येते. बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतून पहिल्यांदाच संत श्रेष्ठ बाळूमामांचा प्रवास मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. आता दिवाळीच्या निमित्ताने या मालिकेमध्ये बाळू-लक्ष्मीची भेट होणार आहे.

मयप्पाने काही दिवसांपूर्वी चिडून बाळूला गावाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. गावाबाहेर चंदूलाल शहा याच्याकडे बाळू सालगडी म्हणून काम करत आहे. पण, चंदूलालच्या आईला मात्र बाळू घरात राहणे पसंत नाहीये. ती अनेक कामे देऊन बाळूला त्रास देण्याचा प्रयत्न करतेय. मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना दिवाळी विशेष भाग बघायला मिळणार आहेत. ऐन दिवाळीत बाळू घरापासून दूर असल्याने सुंदरा नाराज आहे. चंदूलाल बाळूला आमराईमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतो… परंतु चंदूलालची बायको त्याच्या मनाची समजूत घालते की, बाळू आधीच त्याच्या घरापासून दूर आहे, तर आपण त्याला दिवाळीनंतर आमराईमध्ये पाठवू. चंदूलाल देखील या गोष्टीला संमती दर्शवून त्याचा निर्णय माघारी घेतो. चंदूलालच्या घरी गाईची पूजा करून वसूबारस तसेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाळूला ओवाळून, अभ्यंगस्नान देखील होणार आहे. दिवाळीच्या सगळय़ा दिवसात खास ठरणार आहे ते लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 7 नोव्हेंबरला बाळू आणि महालक्ष्मीची भेट होणार आहे. या भेटीनंतर नवे वळण मालिकेत येणार आहे. 5 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7.30 वाजता कलर्स मराठीवर हे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत.

Related posts: