|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » एल्गार परिषदेमुळे कोरेगाव तेढ : पुणे पोलीस

एल्गार परिषदेमुळे कोरेगाव तेढ : पुणे पोलीस 

ऑनलाईन टीम / पुणे :

31 डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदमुळे कोरेगाव भीमा इथे जमलेल्या गटांमध्ये तेढ निर्माण झाला, असा दावा पुणे शहर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय चौकशी समितीसमोर केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर केले. यात हा उल्लेख करण्यात आला आहे.

मात्र एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा इथे हिंसाचार घडला, असे थेट पोलिसांनी म्हटले नाही. पोलिसांचे हे प्रतिज्ञापत्र आतापर्यंतच्या भूमिकेमध्ये काहीसा बदल दर्शवणारे आहे. कारण एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार यांचा काहीही संबंध नाही, असे पुणे पोलिस सुरुवातीपासून सांगत होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात समस्त हिंदू जनजागृती समितीचा प्रमुख मिलिंद एकबोटेमुळे हिंसाचार झाल्याचे म्हटले आहे. मात्र त्यानंतर चौकशी आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुणे ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटेचे नावही घेतलेले नाही. त्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचाराला जबाबदार कोण, याबाबत पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकांमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे

Related posts: