|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » 5 जी स्पेक्ट्रम लिलावारून दूरसंचार कंपन्यात मतभेद

5 जी स्पेक्ट्रम लिलावारून दूरसंचार कंपन्यात मतभेद 

कालावधीसह रक्कमेवरून वोडाफोन-आयडिया, भारती एअरटेल, जियोमध्ये वाद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावातील कालावधी आणि किंमतीवरून वोडाफोन-आयडिया, भारती एअरटेल आणि रिलायन्स जियो इंफोकॉममध्ये मोठे मतभेद असल्याचे समोर आले आहेत. लिलावाची योजना तयार करणाऱया दूरसंचार विभागाला यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. जियोने सर्व उपलब्ध स्पेक्ट्रम लिलावाची मागणी केली असून टेलिकॉम रेग्लुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) कडून सुचित केलेल्या किंमतीबाबत कोणतीही समस्या नसल्याचे म्हटले आहे. तर भारती एअरटेलने मार्च 2019 मध्ये संपणाऱया आर्थिक वर्षात फक्त 4 जी स्पेक्ट्रम लिलावाची मागणी केली आहे. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी वोडाफोन-आयडियाने 2020 पर्यंत कोणतेही लिलाव घेणार नाही तसेच त्यांनी सरकारकडे आत्तापर्यंतच्या दूरसंचार क्षेत्राची स्थिती सुधारण्याबाबत निवेदन दिले आहे.

लिलावासाठी जिओ अतिउत्साही

मुकेश अंबानी यांनी 2016 मध्ये जिओची सेवा सुरू केली असल्याने ते स्पेक्ट्रमच्या लिलावामध्ये विलंब होऊ देणार नाहीत. आम्ही अधिक स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी इच्छूक असून आशा आहे की सरकार लवकरात लवकर स्पेक्ट्रम लिलाव करेल, असे जिओचे अध्यक्ष मैथ्यू ओमेन यांनी ईटीशी बोलताना म्हटले आहे.

जिओ विरोधी कंपन्यांना 90 लाख वापरकर्त्यांचे नुकसान

जिओला मुख्यत्वेकरून डेटामध्ये वाढत्या मागणीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी स्पेक्ट्रम वाढविण्याची गरज आहे. जिओच्या वापरकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत आहे. कंपनीने सप्टेंबरमध्ये 1.3 कोटीपेक्षा जास्त वापरकर्ते वाढविले असल्यामूळे एकूण वापकर्त्यांची संख्या आता 25.2 कोटीपेक्षा जास्त झाली आहे. सप्टेंबरमध्ये जिओच्या विरोधी कंपन्या वोडाफोन-आयडिआ आणि भारती एअरटेल यांना जवळजवळ 90 लाख वापरकर्त्यांचे नुकसान झाले आहे.