|Monday, November 19, 2018
You are here: Home » leadingnews » अवनीला ठार करायचे नव्हते पण स्वरक्षणासाठी गोळी झाडली

अवनीला ठार करायचे नव्हते पण स्वरक्षणासाठी गोळी झाडली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘अवनी’ वाघिणीला आम्हाला ठार मारायचे नव्हते. पण जेव्हा वन खात्याच्या अधिकाऱयाने तिच्यावर ट्रँक्वलाइजर डार्टने निशाणा साधला. त्यावेळी ती उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनाकडे झेपावली. त्यावेळी मी स्वसंरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली, असे शिकारी शआफतअली खान यांचा मुलगा नवाब अजगरअलीने स्पष्ट केले. अवनी वाघिणीला गोळय़ा झाडून ठार मारल्यानंतर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेत शआफतअली खान आणि त्यांचा मुलगा नवाब अजगरअली वादाचा केंद्रबिंदू होते. त्यानंतर प्रथमच या पिता-पुत्रांनी आपली बाजू मांडली. याप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी महाराष्ट्र सरकार तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप केले होते. तसेच शआफतअली खानवर त्यांनी गंभीर आरोपही केले होते.नवाब अजगरअली म्हणाला, मागील 2 वर्षांत अवनीला 5 वेळा ट्रँक्वलाइज करण्यात आले. पण ती शांत झाली नाही. ग्रामस्थांना ती दिसली. वाघिणीच्या हल्ल्यात कोणताही व्यक्ती मारला जाऊ नये म्हणून आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो. वनअधिकाऱयांनी तिच्या दिशेने ट्रँक्वलाइज डार्टने निशाणा साधला. परंतु, यामुळे ती आणखीनच उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनावर ती झेपावली. मी स्वरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली.

 

महाराष्ट्रात वाघांची संख्या अधिक आहे. तेथील जंगलांची क्षमता संपली आहे. जंगलात काही नसल्याने ते बाहेर पडत आहेत. या वाघिणीने 13 जणांचा जीव घेतला होता. मागील 2 वर्षांपासून वन खाते तिला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती शआफतअली खान यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली.

 

Related posts: