|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » साहेब तुम्हाला अख्खा महाराष्ट्र धुवायला आलाय : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

साहेब तुम्हाला अख्खा महाराष्ट्र धुवायला आलाय : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

इमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या खास शैलीतून निशाणा साधला आहे. आज नरक चतुर्दशी, आजच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. याचाच संदर्भ घेत राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या चित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचदरम्यान,एक जण येऊन त्यांच्या कानामध्ये बोलतो की, साहेब… अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ’धुवायला’ आलाय, पाठवू का?. तर दुसरीकडे, चित्रात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे.

 

एकूणच, राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.ज ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात अमित शहा यांना नरकासुराच्या स्वरुपात दाखवलं आहे. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा करण्यात येतो. आज नरक चतुर्दशी… या दिवसाची सुरुवात आंघोळ केल्यानंतर कारेटं पायाखाली एका फोडले जाते. त्याच कारेटे म्हणून अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. भाजपा पार्टी झोपलेली असून, अमित शहारुपी नरकासुराला चिरडण्याचे स्वप्न पाहत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

 

Related posts: