|Friday, August 23, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट

दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट 

ऑनलाईन टीम / पुणे :

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवशके ३४५, दिवाळी पाडवा गुरुवार, दि. ८ नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज दिपोत्सव २०१८ पर्व ७ वेचे आयोजन श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा, शिवाजी महाराज चौक, शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. दिपोत्सवाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट,  महापौर मुक्ता टिळक, तसेच शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा २०१८ मध्ये सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे संकल्पक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. 
शिवछत्रपतींचा हा जगातील पहिला भव्य अश्वारुढ पुतळा तसेच एकसंघ ओतीव काम केलेला एकमेव पुतळा आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पुतळ्याचे यंदा ९१ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पुतळयाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात येणार आहे. 
अटकेपार झेंडा फडकवणारे पानिपत वीर सरदार मानाजी पायगुडे, श्रीमंत सरदार कान्होजी कोंडे, सरदार बाबाजी ढमढेरे, शिवसरदार पिलाजीराव सणस, सरदार हैबतराव शिळीमकर, सरदार त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार कडु, प्रतापगड युध्दवीर सरदार बाबाजी आढळराव डोहर धुमाळ या स्वराज्यघराण्यांच्या प्रतिनिधींना शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे