|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » आयोध्येमध्ये उभारणार रामाची भव्य मूर्ती

आयोध्येमध्ये उभारणार रामाची भव्य मूर्ती 

 

ऑनलाईन टीम / आयोध्या ः

जिह्याचे नाव अयोध्या केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर रामाची भव्य मूर्ती बनविणार असल्याची घोषणा केली. तसेच मंदिराच्या जागेवर मंदिरच बांधणार, मूर्तीच्या जागेसाठी पाहणी करण्यात येणार असल्याचेहि योगी यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून अयोध्येमध्ये रामाचा 151 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची चर्चा होती. यावरून मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले. तसेच शरयू नदीच्या काठावर जागा पाहिल्याचेहि स्पष्ट करण्यात आले. राम मंदिराचा वाद न्यायालयात सुटेल. मात्र, मूर्ती सर्व नियमांमध्ये राहुनच उभारली जाईल. सर्व संत त्यांच्यासोबत आहेत, असेहि योगी यांनी सांगितले.

दिपोत्सवावेळी शरयू नदीच्या काठावर तीन लाख दिवे लावून जागतिक विक्रम करण्यात आला. कदाचित याच जागी रामाची मूर्ती उभारण्यात येईल. राम मंदिर त्याच जागी होते याबाबत कोणतीहि शंका नाहि. भव्य मंदिर बांधण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि नियमानुसार काम होईल, असे योगी म्हणाले.

मंगळवारीच योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिह्याचे नाव बदलून अयोध्या ठेवले. तसेच विमानतळ आणि मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली.

 

 

Related posts: