|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » ‘पुल’ म्हणजे आनंदाच्या वाटा जोडणारा पूल

‘पुल’ म्हणजे आनंदाच्या वाटा जोडणारा पूल 

पुणे / प्रतिनिधी:

छोटय़ाछोटय़ा गोष्टींतून विनोदनिर्मिती करीत आनंद देण्यात पु. . देशपांडे यांचा हातखंडा होता. अफाट कल्पकता, प्रसंगावधान, विनोदबुद्धी, सगळय़ा कलांविषयीची आस्था, मिश्कीलपणा आणि सदोदित हसरे व्यक्तिमत्त्व असणारे पुलम्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल आहे, अशा शब्दांत ज्ये÷ व्यंग्यचित्रकार शि. . फडणीस यांनी पुलंबद्दल बुधवारी गौरवोद्गार काढले.

साहित्यवेध प्रति÷ान, संवाद पुणे आयोजित आणि कोहिनूर ग्रुप प्रायोजित महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. . देशपांडे जन्मशताब्दी सोहळय़ानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूतून त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणाऱया व्यंग्यचित्र आणि त्यांच्या दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शि. . फडणीस यांच्या हस्ते झाले. या वेळी शकुंतला फडणीस, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पु. . देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर, व्यंग्यचित्रकार अलोक निरंतर, साहित्यवेध प्रति÷ानचे अध्यक्ष कैलास भिंगारे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आदी उपस्थित होते.

शि. . फडणीस म्हणाले, सगळय़ाच क्षेत्रातील लोकांशी स्नेहबंध असल्याने पुलंचे आयुष्य समृद्ध झाले. त्यांच्यासारखी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली हे आपले भाग्य आहे. त्यांच्याबरोबर मला काम करता आले. तो अनुभव अतिशय विलक्षण होता. त्यांच्यातील चित्रकार, साहित्यिक, अभिनेता, लेखक, सामाजिक कार्यकर्ता आणि सढळ हाताने दान केलेला देणगीदार जवळून पहिला आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या व्यंग्यचित्रांचे आणि दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले, याचा आनंद आहे. देशपांडे दांपत्याकडे पाहिल्यानंतर सहजीवन कसे असावे, हे शिकायला मिळते. त्यांचे व्यक्तिमत्त्व आनंदी जीवनासाठी प्रेरणादायी आहे. वक्ता, लेखक, नायक, दिग्दर्शक, संगीतकार, गायक अशा विविधांगी भूमिका जगलेल्या पुलंच्या जीवनावर संशोधन व्हावे.

या प्रदर्शनात देशपांडे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, दुर्मीळ क्षण याची माहिती देणारी छायाचित्रे, सहकलाकार, मित्रपरिवार, साहित्यिक यांच्याशी असलेले स्नेहबंध छायाचित्रांमधून उलगडण्यात आले आहेत. गदिमा, बाबूजी, शांताबाई शेळके, राम गबाले, लतादीदी यांच्यासमवेतची छायाचित्रे, अनेक चित्रपट, नाटकातील त्यांच्या भूमिका आणि सुनीताबाईंबरोबरचा सहवास अशी दुर्मिळ छायाचित्रे येथे लावण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या लेखनावर आणि विनोदांवर आधारित व्यंग्यचित्रेही येथे पाहायला मिळणार आहेत.

Related posts: