|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » विसापूर किल्ल्यावर आढळले तीन पुरातन तोफगोळे

विसापूर किल्ल्यावर आढळले तीन पुरातन तोफगोळे 

 

 

लोणावळा / प्रतिनिधी

मावळ तालुक्मयातील विसापूर किल्ल्यावर ऐन दिवाळीत तीन पुरातन तोफगोळे सापडले असून, यातून नवी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य केले जाते. दरवषीप्रमाणे दिवाळीनिमित्त मंचाच्या वतीने विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गडभ्रमंती करत असताना हे तोफगोळे आढळले. दीपोत्सवानंतर मंचाचे कार्यकर्ते गडभटकंती करत असताना उत्तर तटबंदीकडील दारुगोळा कोठाराजवळ भूपृ÷ावर एक लोखंडी तोफगोळा आढळला. पाहणी केली असता 8 ते 10 किलो वजनाचे आणखी दोन लोखंडी तोफगोळे सापडले. संबंधित तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारात मोडतात. या तोफगोळय़ांमध्ये दारू भरून नंतर वातीद्वारे उडविले जात असत, अशी माहिती डेक्कन कॉलेजचे तज्ञ इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी सांगितली. हे तोफगोळे पुरातत्व विभागाच्या कर्मचारी हेमंत वाघमारे व सुभाष दहिभाते यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. संदीप गाडे, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, वैभव गरवड, अमोल गोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related posts: