|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘नृत्य गंगा’तून भरतनाटय़मचे बहारदार सादरीकरण

‘नृत्य गंगा’तून भरतनाटय़मचे बहारदार सादरीकरण 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

दक्षिणात्य नृत्यशैलीतील भरतनाटय़म आणि हिंदुस्थानी संगीताचा अद्भुत समन्वय साथत अपेक्षा मुंदरंगी आणि सुमेधा राणे यांनी कलारसिकांची वाहवा मिळवली. निमित्त होते, नृत्यांजली परफॉरमिंग आर्ट्सतर्फे ‘नृत्यगंगा’ भरतनाटय़म अविष्काराचे.

राजर्षी शाहू स्मारक भनमध्ये रविवारी नृत्य गंगा हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, मुंदरंगी आणि राणे यांच्या गुरू डॉ. सुचेता चाफेकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरूवात दनमन श्लोक आणि प्रस्तारामध्ये ताल चौताल सादर करून झाली. यानंतर सरगममध्ये ताल चौताल, अष्टमंगल ताल दुत धमालने कलारसिकांची मने जिंकत गेली. पुढे भजनी ठेक्यातील ताल घेवून राग मालकंसमधून अष्टपदी, आधातीन ताल घेवून राग चारूकशीमधून येतील कधी यदुवीर हे नाट्यगीत सादर करण्यात आले. तसेच नाही मी बोलत या नाटय़गीतास राग पिलु आणि दादरा ताल, आओ प्यारे गीतास राग चंद्रकंस तर ताल दादय, शिवस्तुतीस राग शंकरा, ताल आदी ताल, चंतरंगास राग आडाणा आणि ताल आदी तालाची साथ देण्यात आली. भजनामध्ये राग भैरवी आणि ताल भजनी ठेका सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी निधी कान्हेकर, अनिल काशिकर, सुमेधा राणे, सुरेखा राणे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन आणि आभार मिनाली हसबनीस यांनी मानले.

Related posts: