|Friday, May 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आयुक्तांचा निषेध करुन बैठकीवर बहिष्कार

आयुक्तांचा निषेध करुन बैठकीवर बहिष्कार 

अंबाबाई किरणोत्सव अडथळ्यांबाबत विविध पदाधिकाऱयांसोबत होणार होती बैठक

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवातील अडथळ्यांचा †िनकाल लावण्यासाठी महापालिकेत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासोबत सोमवारी सायंकाळी बैठक होणार होती. मात्र बैठकीला येण्यास आयुक्तांना 20 मिनिटे उशिर झाला. या कारणावरुन संतप्त भावना व्यक्त करत बैठकीस उपस्थित असलेल्या देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महांडळाचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह शिवसेना, शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि मूर्ती व किरणोत्सव अभ्यासकांनी आयुक्त चौधरी यांचा तिव्र शब्दात निषेध करुन बैठकीवरच बहिष्कार घातला.

   बैठकीसाठी आयुक्तांची किती वाट पाहायची. लोकभावनेचा आदर आयुक्त का करत नाही. तेव्हा आता आयुक्तांसोबत किरणोत्सवातील अडथळ्यांबाबत बैठकच करायची नाही, असे सांगून महापालिकेतील आयुक्तांच्या केबीन शेजारील हॉलमधून सर्व पदाधिकारी बाहेर पडले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पदाधिकाऱयांना बैठकीवरील बहिष्कार मागे घेण्यास विनंती केली. मात्र त्यांच्या विनंतीला कोणीच मनावर घेतले नाही. येत्या 8 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत अंबाबाई मंदिरात किरणोत्सव होत आहे. अभ्यासकांच्या निरिक्षणातून मंदिरासमोरच्या ताराबाई रोडवरील वैद्य, आगळगावकर व देशिंगे यांच्या इमारतांची काही भाग किरणोत्सवात अडथळा करत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. या निष्कर्षानुसार संबंधीतांच्या इमारतींचे काही भाग हटविण्यासाठी गेल्या शनिवारी शिवाजी पेठेतील देवस्थान समिती कार्यालयात देवस्थान समिती, शिवसेना, शिवाजी तरुण मंडळ आदींचे पदाधिकारी, मूर्ती व किरणोत्सव अभ्यास आणि महापालिकेचे अधिकारी यांच्याच बैठक झाली होती. यामध्ये अडथळ्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सोमवारी आयुक्तांना भेटण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार  बैठकीसाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सदस्य संगिता खाडे, शिवाजीराव जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्यासह मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, नगरसेवक किरण नकाते, शाहीप राजू राऊत, मंदिरमूर्तीशास्त्र अभ्यासक ऍड. प्रसन्न मालेकर, विवेकानंद कॉलेजचे खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. पी. डी. राऊत, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण महापालिकेत आले होते.  

  मात्र आयुक्तांना बैठकीला येणे अशक्य झाले. काही वेळाने चौधरी यांना बैठकीला येण्याचा महेश जाधव व संजय पवार यांनी दोनदा निरोप दिला. तरीही चौधरी हे बैठकीस आले नाहीत. त्यामुळे सर्व पदाधिकारी संतप्त होऊन त्यांनी आयुक्तांचा निषेध नोंदवला. गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या किरणोत्सवातील अडथळ्यांच्या प्रश्नाला महत्व देऊन आयुक्तांना बैठकीला येणे अपेक्षीत आहे. मात्र त्यांनी न येऊन आमचा अपमान केला आहे. तेव्हा सर्वांनी बैठकीवर बहिष्कार घालावा, असे विजय देवणे यांनी आवाहन केले. संजय पवार म्हणाले, आयुक्तांनीच लक्ष घातल्यास किरणोत्सवातील अडथळे दुर होऊन अंबाबाईच्या मूर्तीवर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याचे समाधान भाविकांना मिळणार आहे. मात्र आयुक्तांनाच असे घडू नये वाटत आहे. महेश जाधव म्हणाले, गतवर्षीच्या किरणोत्सवावेळी अडथळे हटवू असे सांगणारे महापालिकेचे अधिकारी आता कुठे गायब झाले आहेत. भविष्यात अडथळे हटविण्यास ठोस पाऊले उचलली गेली नाहीत, आम्हालाच पुढचा उपाय करावा. सुजित चव्हाण यांनी महापालिकेच्या व्हरांडय़ातच आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा देऊन किरणोत्सवातील अडथळ्यांबाबत आता आयुक्तांनी आमच्याकडे यावे, असे सांगितले.

Related posts: