|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवसेनेच्या वतीने बग्बवडेत ऊसदरवाढीसाठी रास्ता रोको आंदोलन

शिवसेनेच्या वतीने बग्बवडेत ऊसदरवाढीसाठी रास्ता रोको आंदोलन 

बांबवडे / वार्ताहार

       चालू गळीत हंगामात शेतकऱयांच्या उसाला विना कपात 3600 रुपये प्रति टन दर मिळावा व मागील हंगामातील 200 रुपये त्वरित मिळावे अन्यथा कारखाने पेटऊन देऊ उसा सज्जड दम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला.

   बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे शेतकऱयांना चालू गळीत हंगामात विना कपात. 3600 रुपयेदर मिळण्यासाठी आयोजित रास्ता रोको आंदोलन प्रसंगी ते बोलत होते.

   जाधव पुढे म्हणाले भाजप सरकारने शेतकयांची चेष्टा चालविलीआहे. शेतकयांना मागील गळीत हंगामातील उर्वरीत 200 रूपये व चालू हंगामासाठी विना कपात 3600 रूपये प्रति क्विंटल दर कारखान्यांनी जाहीर करावा.

   शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव निरी म्हणाले चालू गळीत हंगामात शेतकयाला 3600 रुपये दर मिळल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही दर जाहीर झाल्याशिवाय कारखाने सुरु होऊ देणार नाही . सरकारने दिवाळी पूर्वी त्वरित वादीव दर जाहीर करावा व लवकरात लवकर कारखाने सुरू करावेत अन्यथा उसाचे कांडे मोडून देणार नाही.

Related posts: