|Monday, November 19, 2018
You are here: Home » उद्योग » एचडीएफसीकडून व्याज दरात वाढ

एचडीएफसीकडून व्याज दरात वाढ 

नवी दिल्ली

  एचडीएफसी बँकेने ठेवीवरील व्याज दरात 0.50 टक्के पर्यंत वाढ केली आहे. एक कोटीपेक्षा कमी असलेल्या ठेवीवर ही वाढ मंगळवार पासून लागू करण्यात आली आहे. बँकेने 5 ते 8 आणि 8 ते 10 वर्षापर्यंत असलेल्या ठेवीवरील व्याज दर 6 टक्क्यांवरून वाढवून 6.5 टक्के केले आहे. दरम्यान बँक ऑफ बडोदाने कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे.

एचडीएफसी बँक 3 ते 5 वर्षापर्यंतच्या ठेवीवरील 7.1 टक्क्याऐवजी 7.25 टक्के व्याज देणार आहे. तर एक वर्षाच्या एफडीचे व्याज दर 7.3 टक्क्यांऐवजी 7.25 टक्के करण्यात आले आहे.

बँक ऑफ बडोदाचे कर्ज महागले

बँक ऑफ बडोदा ने एक वर्षाच्या कर्जावरील व्याज दर 8.65 टक्के केले आहे. एक दिवसासाठी हा व्याज दर 8.15 टक्के, एक महिन्यासाठी 8.20 टक्के, तीन महिन्यासाठी 8.30 टक्के आणि सहा महिन्यासाठी 8.50 टक्के असेल. तर घर कर्जाच्या ग्राहकांसाठी व्याज दरात कोणताही बदल केला नसल्याचे बँकेने म्हटले आहे.

Related posts: