|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉनच्या मुख्यालय उभारणीस हजार कोटींच्या खर्चाचा

ऍमेझॉनच्या मुख्यालय उभारणीस हजार कोटींच्या खर्चाचा 

वॉशिंग्टन

 ऍमेझॉनचे दुसरे मुख्यालय कोणत्या शहरात होणार आहे त्यांचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. कंपनी 20 शहरामधून एक ठिकाण निवडणार आहे. यासाठी कंपनी 36 हजार 500 कोटी रुपयाचा खर्च करणार असल्यचा अंदाज मांडण्यात आला असल्याची माहिती वॉशिंग्टन पोस्टकडून सादर करण्यात आलेल्या माहितीतून देण्यात आली आहे.

238 प्रस्ताव दाखल

दुसऱया मुख्यालयाच्या इमारतीची उभारणी करण्यासाठी 238 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यातील निवड करुन 20 प्रस्ताव जानेवारी पर्यंत शॉर्टलिस्ट तयार करण्यात आली होती. यातील एका प्रस्तावाची अंतिम निवड करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिका आणि कॅनडा या शहराचे निरिक्षण करुन योग्य त्या ठिकाणाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.

दुसऱया मुख्यालयाची उभारणी करत असताना 10 लाख लोकवस्ती असणाऱया जागेची निवड करण्यात येणार आहे. व विमानतळाची सुविधा, तंत्रज्ञानयुक्त योजनांचा समावेश करुन त्याची उभारणी केली जाणार.

फेसबुक कंपनीने दोन महिन्यापुर्वीच कॅलिर्फोनियात नवीन इमारतीचे एमपीके 21 चे बांधकाम पुर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 2 हजार 160 कोटी रुपये खर्च करुन उभ्या करण्यात आलेल्या या इमारतीला वर्षाकाठी 6.4 कोटी लिटर पाण्याची बचत होणार आहे. यासाठी पाण्याचा पुर्नवापरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

ऍपलचा विस्तार 175 एकरात

ऍपल कंपनीने आपला विस्तार 175 एकरात करुन त्यात 12 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कॉलिफोर्नियामध्ये ऍपल पार्कची उभारणी करण्यात आली आहे. 9000 वृक्ष लागवड करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येत आहे.