|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » दिवाळी गुंतवणूक तेजीत

दिवाळी गुंतवणूक तेजीत 

सेन्सेक्समध्ये 190 अंकाची तेजी, निफ्टी 10,600 जवळपास

वृत्तसंस्था/ मुंबई

दिवाळी स्पेशल सेक्शनमध्ये शुभ मुहूर्तावर बाजारात तेजीचे वातावण राहिले आहे. भारतीय बाजारात 76 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. राष्ट्रीय बाजारात 10,600 जवळपास पोहोचण्यात यशस्वी झाला.

मंगळवारी बाजारात मागील दिवाळी ते या दिवाळी पर्यंतच्या समंत वर्षाच्या कालावधीत 7 टक्क्यांची वाढीच्या नोंदीसह बाजाराने 41 अंकाच्या तेजीने नफा कमाई करत बाजारा बंद झाला. त्यांचा सकारात्मक परिणाम बुधवारच्या मुहूर्त खरेदीच्या सेक्शनमध्ये तेजी वातावणांची नोंदणी करण्यात आली.

शुभ मुहूर्तावर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदीचे वातावण राहिले. भारतीय बाजारात मिडकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी वाढ झाली. स्मॉलकॅप निर्देशांकात 0.8 टक्क्यांची उसळी घेतली.

भारतीय बाजारामध्ये  चौहूबाजूनी खरेदीच्या वातावणाची नोंद करण्यात आली. र्बंकिंग, ऑटो, एफएमसीजी, आयटी, धातू, आणि वीज या कंपन्याच्या समभागांमध्ये समाधानकारक विक्री झाली. राष्ट्रीय बाजारात बँकिंग निर्देशांक 0.5 टक्क्यांची वाढ होत 25,733 वर राहिला. ऑटो, आयटी, धातू, औषध, एफएमसी आणि रियल्टी यांच्या समभागांत खरेदी झाल्याची नोंद करण्यात आली.

निफ्टीच्या ऑटो निर्देशांकांत 0.97 टक्के, आयटी 0.61, एफएमसी 0.85, धातू 0.60 आणि रियल्टी या कंपन्यांच्या निर्देशांकांत वधार झाल्याचे वातावण राहिले.

राष्ट्रीय बाजारात अमेरिकेत  लोकप्रतिनिधी निवडीसाठी झालेल्या निडवणूकीचा परिणाम राष्ट्रीय बाजारवर झाला असल्याचे दिसून आले. येत्या काळात बाजार कोणत्या वातावणात राहणार आहे याकडे गुंतवणूकदाराचे लक्ष लागून राहिल्याचे मत तज्ञांकडून मांडण्यात आली आहेत.