|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आणखी किती युवकांचा जीव घेणार आहात?

आणखी किती युवकांचा जीव घेणार आहात? 

दारू विक्रीसंदर्भात परुळेतील फलकाने खळबळ : फलक हटविला

वार्ताहर / परुळे:

दारू व्यावसायिक व पोलिसांचे संसार उभे करण्यासाठी आणखी किती युवकांचा जीव घेणार आहात?, अशाप्रकारचा मजकूर प्रसिद्ध करून परुळे बाजार ग्रा. पं.च्या मालकीच्या इमारतीवर अज्ञाताने बोर्ड लावला होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. दुपारनंतर हा बोर्ड हटविण्यात आला.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावात रोगराईचे संकट नाही. मात्र, गावात दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आणि मोठय़ा प्रमाणात उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे म्हणत एक जागरूक नागरिक म्हणून गावचे सरपंच व उपसरपंच यांना या बॅनर्सच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे आणि दारुबंदीसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावातील राजकारणी या दारू व्यावसायिकांना पाठिशी घालत आहेत, तर पोलिसांना दिसत नसल्याने त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. गावातील महिलांनी केवळ बचतगटाच्या मिटिंगसाठी एकत्र येऊन उपयोग नाही. दारुबंदीसाठी त्या एकत्र आल्या, तर अनेकांचे संसार वाचतील. या दिवाळीत नरकासूररुपी या दारू व्यावसायिकांचे दहन करा. हा बोर्ड वाचून समर्थन करणाऱयांना दिवाळीच्या शुभेच्छा, असा मजकूर या फलकावर आहे.

परुळेत उभी बाटली, आडवी करण्यासाठी पुढे या. दारू व्यावसायिकांचे हित जाणणाऱया पोलिसांना भाऊबीज म्हणून बांगडय़ा द्या, असे आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Related posts: