|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘सी वॉटर पार्क’ पर्यटनात महत्वाची भूमिका बजावेल!

‘सी वॉटर पार्क’ पर्यटनात महत्वाची भूमिका बजावेल! 

सरपंच प्रसाद देवधर यांचे मत : विजयदुर्गात प्रकल्पाचे उद्घाटन

प्रतिनिधी / विजयदुर्ग:

गावाच्या विकासासाठी पर्यटन विकास होणे आवश्यक आहे. तर पर्यटनासाठी पर्यटन सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने ‘विजयदुर्ग सी वर्ल्ड’ या संकल्पनेंतर्गत ‘सी वॉटर पार्क’ हा तिसरा प्रकल्प येथे राबविण्यात येत असून येथील पर्यटन विकासामध्ये हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावेल, असा आत्मविश्वास सरपंच प्रसाद देवधर यांनी व्यक्त केला.

विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून येथे उभारण्यात आलेल्या ‘सी वॉटर पार्क’ या प्रकल्पाचे उद्घाटन सरपंच देवधर यांच्याहस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य शुभा कदम, उपसरपंच महेश बिडये, ग्रेसीस फर्नांडिस, मुफिद बगदादी, महेश गुरव, दिनेश जावकर, शीतल पडेलकर, संपदा लेले, गणेश मिठबावकर, सुनील सारंग, रशिद तांबोळी, शाहीद धोपावकर, अवी गोखले आदी उपस्थित होते. देवधर म्हणाले, विजयदुर्गमध्ये पर्यटन विकास साध्य करताना येथे प्रथम पॅसेंजर बोटची सुविधा निर्माण करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला न्याहाळताना डॉल्फिनचे दर्शनही पर्यटकांना घडू लागले. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर वॉटर स्पोर्टस्सारखा महत्वांकाक्षी उपक्रमही येथे राबविण्यात आला. आता सी वॉटर पार्क हा प्रकल्प उभारून पर्यटन विकासाला अधिक चालना देण्याचे काम केले जात आहे. पर्यटनातून रोजगार उपलब्ध व पर्यायाने गावाचा विकास व्हावा, या मुख्य उद्देश आहे. सध्याच्या आकडीवारीनुसार सुमारे दीड लाख पर्यटक ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला भेटी देतात. मात्र, येथे पर्यटन सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने पर्यटक स्थिरावत नाहीत. सी वॉटर पार्कच्या माध्यमातून पर्यटन सुविधांची उणीव काही प्रमाणात कमी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पर्यटकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related posts: