|Saturday, March 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पोटनिवडणुकीसाठी सज्ज : कमल हसन

पोटनिवडणुकीसाठी सज्ज : कमल हसन 

वृत्तसंस्था / चेन्नई

तामिळनाडूतील 20 विधानसभा मतदारसंघात होणाऱया पोटनिवडणुकीसाठी मक्कल निधी मय्यम पक्ष (एमएनएम) सज्ज आहे, अशी माहिती बुधवारी ज्येष्ठ अभिनेते व पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी दिली. निवडणुका होणाऱया मतदारसंघांमध्ये पक्षाचे पदाधिकारी नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षांतर बंदी कायदानुसार न्यायालयाने अण्णाद्रमुकाच्या 18 जणांचे आमदारपद रद्द केले आहे. तसेच अन्य दोन मतदारसंघात आमदारांच्या मृत्यूमुळे एकुण 20 मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक होणार आहे; पण त्याचा अद्याप कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. या निवडणुकीसाठी आमचा पक्ष सज्ज आहे. मक्कल निधी मय्यम पक्ष जनतेसाठीचे साधन असेल. भ्रष्टाचार संपुष्टात आला तरच देशातील सर्व राज्यातील सरकार योग्यरीत्या विकास कामांना प्राधान्य देऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या देशात अनेक महत्त्वपूर्ण विषय असताना शेजारच्या देशातील राजकीय घडामोडींवर मत व्यक्त करणे चुकीचे ठरेल, असेही नमूद करत त्यांनी श्रीलंकेतील राजकीय घडामोडींवर भाष्य करणे टाळले.

Related posts: