|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » इब्राहिम मौलानाचे पत्र आरोग्यमंत्र्यांकडून कचरापेटीत

इब्राहिम मौलानाचे पत्र आरोग्यमंत्र्यांकडून कचरापेटीत 

प्रतिनिधी/ पणजी

मासळी विक्रेत्यांतर्फे इब्राहिम मौलाना यांनी गोवा सरकारला पत्र पाठवून मासळीच्या तपासणीकरिता देखरेख समितीवर कोण असावेत इत्यादी बाबतचे दिलेले निवेदन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कचरा पेटीत टाकून दिले आहे.

मंत्री राणे यांनी सायंकाळी या संदर्भात एक ऑडियो जाहीर केला असून त्यात इब्राहिमवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

कचऱयाची टोपली हीच जागा

जनेतच्या आरोग्याच्याबाबत आपण कोणतीही तडजोड करणार नाही. त्याचबरोबर अन्न आणि औषध संचालनालयाचे नियम हे सर्वांनी पाळणे आवश्यक आहेत. इब्राहिम स्वतः अन्न आणि औषध संचालनालयाची मार्गदर्शक तत्वे पाळत नाही आणि ही व्यक्ती सरकारला सल्ला देऊ पाहतेय कशाच्या आधारावर? असा सवाल उपस्थित करुन देखरेख समितीवर कोणी नेतृत्व करावे याबाबतचा सल्ला त्यांनी सरकारला देऊ नये, राणे यांनी सुनावले आहे. त्यांच्या पत्रांना आमच्याकडून केवळ कचऱयाची पेटी हीच जागा असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी खडसावून म्हटले आहे.

आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही

अन्न आणि औषध संचालनालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या पलिकडे आम्ही जाणार नाही आणि कोणालाही जाऊ देणार नाही. अशा व्यक्तींकडे आपण चर्चा देखील करू शकत नाही. आपण त्या खात्याचा मंत्री आहे. आपण कोणाला प्राधान्य द्यावे हे आपणच ठरवणार आहे. दुसरा कोणी मला सांगू शकत नाही. आपण कोणती पावले उचलायची आहेत तीच उचलणार. आपल्याला कोणाच्याच सल्ल्याची आवश्यकता नाही. आम्ही जनतेच्या अन्नाची सुरक्षा पाहतो. त्यावरच आमचे प्राधान्य राहीव. अगोदर अन्न आणि सुरक्षेचे नियम पाळा. नंतरच चर्चेला या. आपण त्याबाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.