|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुहासिनी महिला मंडळाचा दिवाळी सण अनाथालयात

सुहासिनी महिला मंडळाचा दिवाळी सण अनाथालयात 

प्रतिनिधी/ बेळगाव

सुहासिनी महिला मंडळ, वडगांव यांच्यातर्फे दिवाळी सण अनाथालयांच्या मुलांसमवेत साजरा करण्यात आला. वडगांव, जेल शाळेच्या आवारातील अनमोल आश्रमातील मुलांना दिवाळी सणानिमित्त विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले.  अनेकांच्या जीवनात आशेचा किरण आणणारा दिवाळी सण सर्वत्र साजरा केला जातो. मात्र अनाथलयाचे विद्यार्थी यापासून वंचित राहू नयेत म्हणून मंडळाच्या भगिनींनी दिवाळीच्या आदल्या दिवशी अनाथालयाला भेट दिली.

यावेळी सर्व महिलांनी घरातून बनवून आणलेला फराळ व इतर साहित्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा नंदिनी चौगुले, उपाध्यक्षा वृंदा तडकोड, ऐश्वर्या पाटील, वनिता बिर्जे  उपस्थित होत्या. महिलामंडळाच्या सदस्यांकडून या उपक्रमाला मदत करण्यात आली.