|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 34 हॉकीपटूंची निवड

राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 34 हॉकीपटूंची निवड 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बेंगळूरमध्ये 11 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया राष्ट्रीय कनिष्ठांच्या पुरूष हॉकी प्रशिक्षण शिबिरासाठी शुक्रवारी हॉकी इंडियाने 34 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा केली असून यामध्ये पुरूषांच्या वरिष्ठ हॉकी शिबिरातील सहा हॉकीपटूंचा समावेश आहे.

पुरूष कनिष्ठांच्या हॉकी प्रशिक्षण शिबिरामध्ये सुमन बेक, मनदीप मोर, यशदिप  सिवाच,विशाल ऍटील, गुरूसाहिबजित सिंग आणि शिलानंद लाक्रा या वरिष्ठ हॉकीपटुंचा समावेश करण्यात आला आहे. सदर ज्येष्ठ हॉकीपटू भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या भारतीय वरिष्ठ पुरूष हॉकीपटूंच्या शिबिरात सहभागी झाले आहेत. अलिकडेच झालेल्या सुलतान ऑफ जोहर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने रौप्यपदक मिळविले होते. रौप्यपदक विजेत्या भारतीय कनिष्ठ हॉकी संघातील खेळाडूंचा बेंगळूरमधील हॉकी प्रशिक्षण शिबिरासाठी समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने सुलतान  ऑफ जोहर चषक हॉकी स्पर्धेत यजमान मलेशियाचा 2-1,  न्यूझीलंडचा 7-1, जपानचा 1-0 तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा 5-4 अशा गोल फरकाने पराभव केला होता.  तर या स्पर्धेत राऊंड रॉबिन आणि अंतिम सामन्यात ब्रिटनकडून भारताला 3-2 अशी हार पत्करावी लागली होती.

राष्ट्रीय कनिष्ठांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी हॉकीपटूंची यादी पुढीलप्रमाणे- गोलरक्षक- पंकजकुमार रजाक, पवन, कमल बिरसिंग, बचावफळी- सुमन बेक, मोहम्मद फराज, संजय, सोमजित, मनदीप मोर, परमजित सिंग, एम. दिनाचंद्र सिंग, प्रिन्स, वरिंदर सिंग, सिरिल लुगान, मध्यफळी- अक्षय अवस्थी, ग्रेगरी, यशदीप सिवाच, हरमनजित सिंग, विष्णुकांत सिंग, गोपीकुमार सोनकर, विशाल ऍन्टील, निरजकुमार वारीबाम, रविचंद्र सिंग एम., हसप्रित सिंग, आघाडीफळी – सुदीप चिरमाको, मनिंदर सिंग, गुरूसाहबजित सिंग, अमनदिप सिंग, अभिलाष स्टॅलिन, अभिषेक, मनि सिंग, प्रभज्योत सिंग, शिवम आनंद आणि राहुलकुमार जब्बार.