|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » एफआरपीपेक्षा जादा दर देणे हा सरकारचा विषय नाही-सहकारमंत्री देशमुख

एफआरपीपेक्षा जादा दर देणे हा सरकारचा विषय नाही-सहकारमंत्री देशमुख 

प्रतिनिधी/ सोलापूर

केंद्र व राज्य सरकारने एफआरपीचा ठरवून दिलेला दर शेतकऱयांना देण्यात येईल. तो सर्व कारखानदारांनी देणे बंधनकारक आहे. परंतु, त्याच्यापेक्षा जादा दर देणे हा ‘त्या’ ‘त्या’ कारखान्यांचा प्रश्न असून तो सरकारचा विषय येत नाही, असे मत सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. देशमुख हे शनिवार सोलापूरात होते. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनीधींनी ‘एफआरपी पेक्षा जादा दर द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.’ हा ज्वलंत मुद्याकडे सहकारमंत्री देशमुख यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

 सहकारमंत्री देशमुख म्हणाले, उसबिल 14 दिवसांच्या आत एकदाच द्यावे, अशी शेतकऱयांची मागणी आहे. मात्र कारखानदारांची परिस्थीती पाहता हे शक्य नाही. उत्पादित साखरेला लगेच बाजारपेठ मिळत नाही. यामध्ये शेतकरी व कारखानदार दोघे टिकले पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे. यावेळी गाळप परवाना व काही कारखान्यांकडून बिले वाटप न झाल्याच्या तक्रारीबद्दल विचारले असता सहकार व पणन मंत्री देशमुख म्हणाले, गाळप परवाना किती कारखान्यांना दिला, याची माहिती आता नसून ती नंतर देतो आणि सिध्देश्वर व मातोश्री साखर कारखान्याबद्दल तक्रार आली होती. त्याची चौकशी केली असता मातोश्रीने बिले वाटप केली आहेत. तर सिध्देश्वर साखर कारखान्यास कर्ज मिळाले आहे. त्यांच्याकडूनही दिवाळीच्या सुट्टया संपल्यानंतर बिले वाटप होईल, अशी माहिती आपणास मिळाल्याचे शेवटी देशमुख म्हणाले.