|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे पाणी उपसा बंद

ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे पाणी उपसा बंद 

वार्ताहर/ शिखरशिंगणापूर

माणमध्ये केवळ मोही परिसरात थोडासा पाऊस झाला आहे. त्यामुळे मोही तलावामध्ये पाणी साठा होता, पण गावच्या धनदांडग्या व दुष्काळी परिस्तिथीचे गांभीर्य नसलेल्या काहींनी मोही तलावात रात्रंदिवस थेट उपसा केल्याने तलाव कोरडा पडू लागला. याबाबत माजी सैनिक धनाजी देवकर व युवाप्रतिष्ठान कार्यकर्त्यानी दिवाळी पाडव्यालाच उपोषणाचे हत्यार उपसले. पाणी उपसा थांबविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले. त्वरित उपसा बंद केल्याने गाव करेल ते राव काय..? अशी मोही पंचक्रोशीत चर्चा आहे.

युवा प्रतिष्ठानचे उपोषण मागे

मोही (ता. माण) गावानजीक मोठा पाझर तलाव आहे. जवळपास या तलावातील पाणीसाठय़ामुळेच मोही व परिसरातील ग्रामस्थ तसेच मुक्या जनावरांची तहान भागते. वार्षिक यात्रेसही टँकर लागत नाहीत. मात्र, या तलावत पाणीसाठा असेल तर ना ? वास्तविक पहाता तलावातील पाणीउपसा न झाल्यास मोही परिसरात पाणीटंचाई अजिबात जाणवणार नाही. मात्र तलावनजीक शेती असणारे सर्व शेतकरी वारेमाप उपसा करतात. ग्रामस्थंनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रांताधिकारी व तहसील कार्यालयातून मोही तलाव परिसरातील सिंचन उपसा त्वरित बंद करण्याचे आदेश दिले गेले. मात्र, तलावात आमच्या जमिनी गेल्या. या नावाखाली गावचे हित न पाहता काही धनदांडगे ग्रामसभेच्या ठरावाला व शासन आदेशाला जुमानत नाहीत. त्यासाठी अखेर उपोषणाचे हत्यार उपसावे लागल्याचे युवाप्रतिष्ठान व मोही ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे.

   याबाबत उपोषणकर्त्यांसमोर चर्चा करून मोहीच्या महिला सरपंच श्रीमती वैशाली नेटके, उपसरपंच देवराज कदम, सदस्य धनाजी देवकर, माजी सरपंच साहेबराव भगत, राजाराम देवकर, ग्रामसेवक बडवे डी के यांनी युवाप्रतिष्ठाण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या व प्रशासन यंत्रणेवर अवलंबून न राहाता दुष्काळी भयानक परिस्थिती जाणून पाणी उपसा थांबविण्याचा निर्णय घेतला. यापुढे विद्युतपंप, डिझेल इंजिन, सायफन अथवा कोणत्याही प्रकारे कोणीही पाणी उपसा केल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरूपाचां गुन्हा संबंधितांवर दाखल केला जाणार आहे. याबाबत लेखी उत्तर देण्यात आले. ठोस कार्यवाहीबाबत ग्रामपंचयत
प्रशासनाकडून धन्यवाद देऊन युवाप्रतिष्ठाण कार्यकर्त्यानी उपोषण मागे घेतले,    

धनाजी देवकर, पांडुरंग चव्हाण, विजय कदम, श्रीराम कदम, विजय तानाजी माने, दयानंद देवकर, प्रशांत देवकर, सुहास देवकर, जमिर आतार, भरत कुंभार, स्वप्निल देवकर माणिक जाधव  विजय तात्यासो देवकर,सचिन सुभाष सावंत,सुरज देवकर, धनाजी सि.देवकर, हरीबा देवकर, किरण देवकर, सचिन सावंत, शामराव कोळी, संदिप देवकर, अजित देवकर, दादासो चव्हाण यांच्यासह सुमारे 41 जण उपोषणास बसले होते.