|Saturday, December 15, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज

‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज 

आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले. जगविख्यात बप्पी लाहिरींनी 45 वर्षांनंतर आता मराठी सिनेसफष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ या आगामी सिनेमाद्वारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी कानसेनांना ऐकायला मिळणार आहे.

नुकताच दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातल्या या नव्या गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले. या गाण्याला अमितराजने संगीतबद्ध केले आहे तर बप्पीदांसोबत पार्श्वगायिका वैशाली सामंतने हे गाणे गायले आहे. रेकॉर्डिंग झाल्यावर बप्पीदांचा भरभरून आशिर्वाद मिळालेला संगीतकार अमितराज म्हणाला, ‘माझ्या करियरमधली यंदाची दिवाळी ही सर्वाधिक आठवणीतली ठरली. ज्यांची गाणी लहानपणापासून ऐकत आलो. अशा मोठय़ा संगीतकाराकडून आज मी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तेव्हा ती दिवाळीतलं सर्वात मोठी भेट असते. बप्पी लाहिरी म्हणाले, मराठी सिनेसफष्टीत आणि मराठी माणसांसोबत काम करायला मला खूप आवडते. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला मी हिंदी सिनेसफष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. 1975 ला आलेल्या राजा ठाकुर यांच्या जख्मी सिनेमामुळे माझे करीयर खऱया अर्थाने सुरू झाले आणि मी लकी ठरलो. मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमुळे मी काम करू शकलो नाही. तरीही 1990 ला डोक्याला ताप नाही सिनेमासाठी मी संगीत दिग्दर्शन केले होते. पण, नंतर मराठीत काम करण्याची संधीच आली नाही. आता संजय जाधव यांच्या सिनेमामुळे मी मराठीत परत येऊ शकलो. अमितराजने गाण्याला दिलेली चाल मला आवडली. पटकन ओठांवर रूळेल, असे हे गाणे आहे.

  दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ‘आम्ही खूप लकी आहोत, की बप्पीदांनी लकीमध्ये गाणे गाण्यासाठी होकार दिला. बप्पीदा हे सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकातले खूप मोठे संगीतकार आहेत. त्यांना लकी सिनेमाद्वारे आम्ही मराठी सिनेसफष्टीत घेऊन येतोय याचा अभिमान वाटतोय. बी लाइव्ह प्रोडक्शन्स आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दीपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित लकी लवकरच महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागफहांमध्ये झळकणार आहे.

Related posts: