|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर !

राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर ! 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठी नागरिकांचा कैवार घेणारे आणि परप्रांतीयांविरोधात कायमच विरोधी भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

राज ठाकरेंना उत्तर भारतीय मंच ने दिलेले आमंत्रण स्वीकारले असून दिनांक 2 डिसेंबर 2018 रोजी हा कार्यक्रम कांदिवली येथे होणार आहे, असे संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मुंबईतील कांदिवली इथे बुराभाई हॉलमध्ये सकाळी अकराच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिले होते, जे आता त्यांनी स्वीकारले आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसेच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता. आता ते उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी इमेज तयार करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे.